लावा दोन फोन बाजारातून हटवणार, हे आहे कारण

लावा लवकरच त्यांचे Z कॅटेगरीचे दोन स्मार्टफोन बाजारातून हटवणार आहे.

Updated: Oct 5, 2017, 05:39 PM IST
लावा दोन फोन बाजारातून हटवणार, हे आहे कारण

मुंबई : लावा लवकरच त्यांचे Z कॅटेगरीचे दोन स्मार्टफोन बाजारातून हटवणार आहे. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले आकर्षक हँडसेट बाजारात आणण्यासाठी लावा हे स्मार्टफोन बाजारातून हटवणार आहे. लावा Z10 आणि Z25 ही मॉडेल बाजारातून लवकरच हटवणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ११,५०० आणि १८,००० रुपये एवढी आहे.

आता फक्त १० हजार रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन बाजारात आणण्याचा कंपनीचा विचार आहे. १० हजार रुपयांपर्यंतचे सहा ते सात फोन ठेवण्याची आमची रणनिती असल्याचं लावा कंपनीनं सांगितलं आहे.

लावानं गुरुवारी भारतात Z सीरिजचे Z60, Z70, Z80 आणि Z90 हे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या चार नव्या स्मार्टफोनची किंमत ५,५०० ते १०,७५० रुपये आहे, हे हँडसेट ई कॉमर्स वेबसाईट्स आणि मोबाईल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.