१ रुपयांत १० किमी चालते ही स्कूटर, लवकरच होणार वितरण

एक रुपयांत १० किमी चालणारी स्कूटर लवकरच भारतात लॉन्च होत आहे. या स्कूटरचे वितरण लवकरच होणार आहे. त्यामुळे बाईक प्रेमींसाठी ही एक चांगली बातमी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 20, 2018, 05:14 PM IST
१ रुपयांत १० किमी चालते ही स्कूटर, लवकरच होणार वितरण title=

मुंबई : एक रुपयांत १० किमी चालणारी स्कूटर लवकरच भारतात लॉन्च होत आहे. या स्कूटरचे वितरण लवकरच होणार आहे. त्यामुळे बाईक प्रेमींसाठी ही एक चांगली बातमी आहे.

जपानची इलेक्ट्रिक टू-व्हीलर तयार करणारी कंपनी ओकिनावाने (okinawa) डिसेंबर २०१७ मध्ये भारतीय बाजारात ई-स्कूटर 'प्रेज' लॉन्च केली. कंपनीचा दावा आहे की, या स्कूटरला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी ओकिनावाने २०१६ मध्ये इलेक्ट्रिक स्कूल 'रिज'ला बाजारात आणलेय. लॉन्चिंगच्यावेळी कंपनीने दावा केलाय की 'प्रेज' 'रिज'चे चांगले व्हर्जन आहे.

okinawa, okinawa praise, e scooter praise, okinawa praise price, okinawa praise booking, okinawa praise delivery

 'प्रेज' ओकिनावाची हायस्पीड स्कूटर आहे. दिल्लीतील एक्स शोरुममध्ये ती उपलब्ध असून तिची किंमत ५९,८८९ रुपये आहे. ही स्कूटर दिल्लीत १९ डिसेंबरला लॉन्च केली. कंपनीने 'प्रेज'ची बुकिंग २००० रुपयांत सुरु केली आहे. या स्कूटरचे वितरण आधी दिल्लीत होईल. त्यानंतर अन्य शहरात होणार, असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

हे आहेत फीचर्स

ओकिनावाच्या 'प्रेज'ला १००० व्होल्टची दमदार मोटर बसविण्यात आलेय. ही मोटर ३.३५ बीएचपीची पॉवर निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर फूल चार्ज केल्यानंतर १७५ ते २०० किमी चालते. कंपनीच्या दाव्यानुसार रस्त्यावर ७५ प्रति तास वेगाने ही स्कूटर धावू शकते. तर ही स्कूटर २ तासात चार्ज होते. या इलेक्ट्रिक स्कूटर ऑनरोड किंमत ६६,००० हजार रुपये आहे.

okinawa, okinawa praise, e scooter praise, okinawa praise price, okinawa praise booking, okinawa praise delivery