close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आता स्मार्टफोनमध्ये 5 जी नेटवर्क, जबरदस्त मोबाईल!

वन प्लस कंपनीने आपला फाय जी नेटवर्क असलेला 'वन प्लस सेव्हन' हा फोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे.  

Updated: Feb 5, 2019, 05:49 PM IST
आता स्मार्टफोनमध्ये 5 जी नेटवर्क, जबरदस्त मोबाईल!
संग्रहित छाया

मुंबई : सध्या स्मार्टफोनमध्ये नवनवीन बदल होत आहेत. अनेकांच्या हातात स्मार्टफोन हमखास दिसतो. मात्र, ज्या स्मार्टमोबाईल नवीन गोष्टी असतील त्याला अधिक पसंती मिळत आहे. तरुणांमध्ये याच मोबाईलची जास्त क्रेझ दिसून येते. सुरुवातीला टू जी आणि थ्री जीचा जमाना होता. त्यानंतर फोर जी आले. आता त्यापुढे फाय जी येत आहे. काही कंपन्यांनी फाय जी फोन बनविण्यास सुरुवात केली आहे. वन प्लस कंपनीने यात आघाडी घेतली आहे. वन प्लस कंपनीने आपला फाय जी नेटवर्क असलेला 'वन प्लस सेव्हन' हा फोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता मार्केटमध्ये फाय जीची चर्चा सुरु झाली आहे.

नव प्लस कंपनीही सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. कंपनीने आपला फाय जी नेटवर्क असलेला 'वन प्लस सेव्हन' हा फोन आणण्याची तयारी केली आहे. दरम्यान, प्रत्यक्ष बाजारात हा फोन यायला थोडा कालावधी लागणार आहे. मात्र, घोषणा केल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसरसह लाँच केला जाणार आहे.

'वन प्लस सेव्हन' यात फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये पाच नवे फीचर्स असू शकतात. वनप्लस ६ आणि वनप्लस ६ टी या फोनमध्ये नॉच देण्यात आले होते. आता वनप्लस सातमध्ये नॉच नसेल. या फोनमध्ये स्लायडर फ्रन्ट कॅमेरा असू शकतो असे सांगितले जात आहे. तसेच यामध्ये पॉपअप सेल्फी कॅमेराही असण्याची शक्यता आहे. हा फोन एचडीआर सपोर्टही करेल त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. तसेच मोबाईलला खास  चार्जिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. ‘Warp Charge ३०’मुळे हा फोन अतिशय वेगाने चार्ज होईल. यावर्षी लाँच होणाऱ्या सर्व स्मार्टफोनचे हे स्टँडर्ड फीचर असतील असा दावा कंपनीने केला आहे. 

वन प्लस सातमध्ये सोनी आयएमएक्स ५८६ सेन्सरचा वापर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल कॅमेरा असू शकतो. सर्वात आधी हा स्मार्टफोन युरोपमध्ये लाँच केला जाणार आहे. त्यानंतर तो अन्य देशांमध्ये लाँच होईल. भारतात कधी येणार याबाबत काहीही माहिती नाही. तसेच या फोनची किंमतही जाहीर करण्यात आलेली नाही.