OPPO-JIO चा मोठा धमाका! स्वस्त मिळणार A15 3GB स्मार्टफोन; 6 महिने नो कॉस्ट EMI

ओप्पो आणि जिओ कंपनीने सोबत मिळून ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. 

Updated: Aug 19, 2021, 12:31 PM IST
OPPO-JIO चा मोठा धमाका! स्वस्त मिळणार A15 3GB स्मार्टफोन; 6 महिने नो कॉस्ट EMI title=

मुंबई : ओप्पो आणि जिओ कंपनीने सोबत मिळून ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. 

जिओची एक्सक्लुसिव ऑफर घेतल्यावर कंपनी ग्राहकांना ब्रॅंड न्यू OPPO A15 3GB फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी देणार आहे.

जिओच्या 999 रुपयांचा प्लॅन खरेदी केल्यानंतरच ग्राहकांना 9991 रुपयांत हा स्मार्टफोन मिळणार आहे. 

याशिवाय 7 हजार रुपयांचे अधिकचे फायदेदेखील ग्राहकांना मिळणार आहेत. ही ऑफर फक्त जिओच्या नव्या आणि जुन्या ग्राहकांसाठी कंपनी सादर करीत आहे.

OPPO A15 3GB स्मार्टफोनला ग्राहकांना विना जिओ सिम आणि जिओ सिम असणारे देखील खरेदी करू शकतात. 

नव्या ग्राहकांना वॉइस कॉल आणि डाटासाठी जिओ सिम कार्ड खरेदी करणे गरजेचे आहे. ग्राहकांना ओप्पोतर्फे ही ऑफर 999 रुपयांचा प्लॅनवर मिळत आहे.