RBI च्या 4 गेम चेंजर घोषणा, फीचर फोनवरही UPI पेमेंट शक्य

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच फीचर फोनसाठी UPI-आधारित पेमेंट उत्पादने आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

Updated: Dec 9, 2021, 04:42 PM IST
RBI च्या 4 गेम चेंजर घोषणा, फीचर फोनवरही UPI पेमेंट शक्य

मुंबई: फीचर फोन वापरणाऱ्या मोबाईल ग्राहकांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांप्रमाणे फीचर फोन वापरणाऱ्यांनाही UPI पेमेंटची सुविधा मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच फीचर फोनसाठी UPI-आधारित पेमेंट उत्पादने आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चलनविषयक धोरण जाहीर करताना ही माहिती दिली.

ऑन-डिव्हाइस UPI वॉलेट  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कमी मूल्याचे व्यवहार अधिक कार्यक्षम करण्यासाठी UPI अॅपमध्ये 'ऑन-डिव्हाइस' वॉलेट सुरू करणार आहे. 

RBI च्या मौद्रिक धोरण अहवालानुसार, भारतात सुमारे 118 कोटी मोबाइल वापरकर्ते आहेत. आणि त्यापैकी सुमारे 74 कोटी स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. म्हणजेच देशात फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 44 कोटी आहे.

RBI च्या या 4 मोठ्या घोषणा गेम चेंजर ठरणार

1. ऑन डिवाइस यूपीआई वॉलेट  

लहान रकमेच्या पेमेंटसाठी UPI वॉलेट.
- इंटरनेटशिवाय ऑफलाइन व्यवहार शक्य होणार.
स्मार्टफोनमध्ये UPI द्वारे वॉलेटमध्ये पैसे जोडले जाऊ शकतात आणि इंटरनेटशिवाय लहान रक्कम भरली जाऊ शकते.
- ग्राहकांना व्यवहार अयशस्वी झाल्याची तक्रार राहणार नाही.
- बँकांच्या सेवांवर कमी भार पडेल आणि संसाधनांचा खर्चही कमी असेल.
प्रीपेड साधनांच्या धर्तीवर ऑन-डिव्हाइस UPI वॉलेट लाँच केले जाईल.
UPI व्यवहारांमध्ये, 50% पेमेंट 200 रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी केले जाते.
ग्राहकांच्या व्यवहाराच्या अनुभवात कोणताही बदल होणार नाही.
लहान पेमेंटसाठी UPI वॉलेटमध्ये निश्चित रकमेची मर्यादा असेल.

2. फीचर फोनसाठी UPI
देशातील 44 कोटी ग्राहकांसाठी हे वरदान ठरेल.
- इंटरनेटशिवाय फोनद्वारे UPI पेमेंट
किरकोळ देयके नियामक सँडबॉक्सद्वारे सादर केली जातील
- UPI शी कनेक्ट केल्यानंतर फीचर फोनचे ग्राहक BNPL साठी पात्र होतील

हेही वाचा - तुमच्या होमलोनच्या व्याजदरांवर परिणाम करणाऱ्या रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट विषयी जाणून घ्या सोप्या भाषेत

3. डिजिटल पेमेंटसाठी शुल्क माफक
डिजिटल पेमेंटचे शुल्क सर्वांसाठी परवडणारे बनविण्याचा विचार.
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पीपीआयशी संबंधित शुल्कांवर चर्चापत्र जारी केले जाईल.
व्यापारी संबंधित MDR शुल्क विचारात घेतले जाईल.
सेवा देणारे व्यापारी MDR शुल्क भरतील.
पेमेंटवर लागणारे सुविधा शुल्क आणि अधिभार यावर अभिप्राय घेतला जाईल.

हेदेखील वाचा - Rakesh Jhunjhunwala यांचे 5 मल्टीबॅगर शेअर; एका वर्षात कोट्यावधींचा दिला परतावा

4. UPI गुंतवणुकीची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये 
रिटेल डायरेक्ट स्कीममधील UPI गुंतवणुकीची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात येणार आहे.
सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी UPI द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक शक्य आहे.
IPO गुंतवणुकीतही UPI गुंतवणुकीची मर्यादा 5 लाख रुपये केली जाईल.
SEBI HNI मध्ये 2 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीचा विचार करत आहे.