मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या गेट मोर देन १००% कॅशबॅक ऑफरची अंतिम तारीख वाढवली आहे. १५ मार्चला या ऑफची शेवटची तारिख होती. ती वाढवून आता ३१ मार्च करण्यात आली आहे. जर अजूनही तुम्ही या ऑफरचा लाभ घेतला नसेल तर तुमच्याकडे १५ दिवसांचा वेळ आहे.
जियोच्या १००% कॅशबॅक ऑफरअंतर्गत प्राईम युजर्सला ३९८ रुपये किंवा त्याच्याहुन अधिक किंमतीचा रिचार्ज करावा लागेल. त्यावर तुम्हाला ४०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. या ऑफरचा लाभ कसा घ्याल पहा...