नवी दिल्ली : रिलायन्स जिओ युजर्ससाठी नवनव्या ऑफर्स सादर करत आहेत. युजर्संना स्वस्त दरात प्लॅन देवून कंपनीने अजून एक खास सर्व्हीस सुरू केली आहे.
आता कंपनीने जिओ टी. व्ही. लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हीसचे वेब व्हर्जन लॉन्च केले आहे. या सुविधेचा लाभ घेत युजर्स आता वेब ब्राऊजर्सच्या माध्यमातून लाईव्ह टी. व्ही. शो पाहू शकतात. जिओ टी. व्ही. च्या वेब व्हर्जनची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे.
युजर्सच्या या मागणीला पूर्ण करण्यासाठी जिओने टी. व्ही. चे वेब व्हर्जन लॉन्च केले आहे. जर तुम्ही जिओ युजर्स असाल कर कोणत्याही ब्राऊजर मध्ये जावून https://jiotv.com/ लॉगईन करा. जिओ टी. व्ही. च्या वेब व्हर्जनमध्ये युजर्सला जिओ टी. व्ही. अॅपमध्ये उपलब्ध असलेला कंटेन्ट आणि टी. व्ही. चॅनल्स पाहता येतील. याचा फायदा फक्त जिओ युजर्सना मिळेल.
जिओ टी. व्ही.मध्ये इंटरटेनमेंट, मुव्ही, न्यूज आणि स्पोर्टस असे सर्व चॅनल्स आहेत. यात एचडी चॅनलला फिल्टर करण्याचा ऑप्शन देखील आहे. यात तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता. याच्या कॅचअप फिचरच्या मदतीने तुम्ही गेल्या सात दिवसातील कंन्टेन पाहू शकता. वेबवर जिओ टी. व्ही. किंवा जिओ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला jiotv.com किंवा jiocinema.com वर लॉगईन करावे लागेल. यात तुम्हाला एका यूजर आयडी आणि पासवर्डची गरज भासेल.
वेब व्हर्जन एक्सेस करण्यासाठी तुमच्याकडे जिओ मोबाईल नेटवर्क असणे गरजेचे आहे. वेबवर युजर्सची संख्या जलद गतीने वाढत आहे, त्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. गेल्यावर्षी हॉटस्टार सारख्या सेवा अत्यंत लोकप्रिय झाल्या. जिओ सब्सक्राइबरकडे चॅनल मोठ्या पडद्यावर बघण्याचा पर्याय आहे.