सॅमसंगवाले भाजी विकायचे, तर नोकिया, मोटरौलावाले...

मात्र या सर्व मोबाईल कंपन्या सुरूवातीला कशाची निर्मिती करायची आणि काय विकायची हे पाहणे फार रंजक आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 23, 2017, 09:34 PM IST
सॅमसंगवाले भाजी विकायचे, तर नोकिया, मोटरौलावाले... title=

मुंबई : सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची अनेक उपकरणं बाजारात आहेत, पण सॅमसंग सर्वात जास्त नावारूपाला आली ती मोबाईल कंपनी म्हणून. भारतात तर असे फार कमी लोक असतील ज्यांनी सॅमसंगचा फोन वापरला नाही.

कदाचित असे फार बोटावर मोजण्यासारखे लोक असतील ज्यांनी नोकिया फोन वापरला नसेल. मोबाईल निर्मितीत आघाडीवर असेलली मोटोरौला कंपनीही सर्वांना माहित आहे. मात्र या सर्व मोबाईल कंपन्या सुरूवातीला कशाची निर्मिती करायच्या आणि काय विकायच्या हे पाहणे फार रंजक आहे.

सॅमसंगवाल्यांच्या सुरूवात भाजी विकण्यापासून....

कोरियामध्ये 1938 साली सॅमसंगने भाजीपाला विकण्याच्या स्टोअरपासून सुरूवात केली. येथे सुके मासे, नुडल्स आणि हिरव्या पालेभाज्या मिळत. सॅमसंगने 1960 साली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती सुरू केली. सॅमसंग आता जगातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपैकी एक आहे.

नोकियाचा पहिल्यांदा कागद निर्मितीचा कारखाना...

कागद निर्मितीचा कारखाना म्हणून नोकियाची ओळख होती, नोकिवीतृन नदीच्या नावावरून या कागद मिलला नोकिया नाव पडलं होतं. मोबिरा सिटीमॅन नावाचा पहिला मोबाईल नोकियाने 1987 साली बनवला, आणि त्यानंतर नोकियाच्या फोनने जगभरात उद्योग वाढवला.

मोटोरौलावाले कार रेडिओ बनवण्यात पटाईत होते...

मोटोरौला कंपनी सुरूवातीला कार रेडिओ बनवण्यात आघाडीवर होती. मोटोरौलाने 1960 साली टेलिफोन बनवणं सुरू केलं, आता मोटोरौला ही कंपनी लिनोवोसोबत मोबाईलची निर्मिती