मुंबई : स्नॅपचॅट अॅप जगभरातील तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या अॅपद्वारे, यूजर्स स्नॅपिंग, चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग करतात. आता या अॅपच्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आत्तापर्यंत हे अॅप फक्त स्मार्टफोनवर वापरता येत होतं, पण आता हे अॅप डेस्कटॉपवरही वापरता येणार आहे. स्नॅपचॅटने आता या अॅपचं वेब व्हर्जन लाँच केलं आहे. तुम्ही आता डेस्कटॉपवर तुमचं स्नॅपचॅट अकाऊंट लॉग इन करू शकता आणि तुम्ही डेस्कटॉपवरूनच व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग आणि स्नॅपिंगचा आनंद घेऊ शकतो.
Snapchat+ सब्सक्राइबर्सला होणार याचा फायदा
सध्या, स्नॅपचॅट अॅपचं वेब व्हर्जन फक्त Snapchat+ सब्सक्राइबर्ससाठी लॉन्च करण्यात आलं आहे. ज्या लोकांकडे Snapchat + चं सब्सक्रिप्शन आहे त्यांना त्याचे विशेष फीचर्स वापरण्याची तसेच एक्सपेरिमेंटल फीचर वापरण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच अशा यूजर्संना विशेष बॅज देण्याची योजनाही तयार करण्यात आली आहे.
सध्या 'या' देशांमध्ये करता येणार वापर
सध्या, वेब व्हर्जन फक्त अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील Snapchat+ सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध असेल. लवकरच हे फीचर्स इतर देशांतील यूजर्ससाठी देखील उपल्बध केलं जाईल. वेब व्हर्जन सध्या फक्त Google Chrome वर सपोर्ट करत आहे. पण, लवकरच इतर ब्राउझरमध्ये लॉन्च करण्याची कंपनीचा विचार आहे.