360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि ADAS सिस्टम! कियाची जबरदस्त SUV लाँंच

नवी किया सोनेट भारतात लाँच झाली आहे. जाणून घेवूया Kia Sonet Facelift कारचे बेस्ट फिचर्स. 

Updated: Dec 18, 2023, 11:59 PM IST
360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि ADAS सिस्टम! कियाची जबरदस्त  SUV लाँंच title=

Kia Sonet Facelift: कियाने आपली नवीन SUV कार लाँच केली आहे. 360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि ADAS सिस्टम असलेली ही कार सर्वात हायटेक कार आहे. Kia Sonet Facelift असे या कारचे नाव आहे. 

या कारमध्ये 10 सेल्फ ड्राईव्ह मोड आहेत. एडीएएस सिस्टम आहे. पुढील भागात धडक होऊ नये म्हणून मदत करणारी यंत्रणा - फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट, लीडिंग व्हेइकल डिपार्चर अलर्ट आणि एकाच लेनमध्ये राहण्यासाठी सहाय्यकारी - लेन फॉलोइंग असिस्ट  या वैशिष्ट्यांचा कारमध्ये समावेश करण्यात आला आहे. मजबूत 15 हायसेफ्टी फीचर्सच्या अंतर्भावासोबतच सोनेट आता 25 पेक्षा सुरक्षात्मक वैशिष्ट्यांसोबत येते.

या श्रेणीत15 स्टँडर्ड सुरक्षात्मक वैशिष्ट्यांसह येणारी नवी सोनेट ही एकमेव कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. इतकेच नव्हे तर, नव्या सोनेटमध्ये या श्रेणीतील 10 सर्वोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाइन, मागील दारावरील सनशेड कर्टन सर्वच दरवाजांत पॉवर विंडो आहेत, त्याही सुरक्षेसह वन टच ऑटो अप-डाऊनसह. आणि आणखी काही वैशिष्ट्यांचे नाव घ्यायचे म्हटले तर नव्या सोनेटमध्ये विषाणू आणि जीवाणूंपासून सुरक्षेसाठी स्मार्टप्युअर एअर प्युरिफायरही देण्यात आले आहे.

कॅरेन्स आणि श्रेणीत प्रथम सेल्टोसमध्ये या उद्योगातील पहिल्याच 6 स्टँडर्ड एअरबॅग्ज सादर करण्याचा बहुमान पटकावल्यानंतर किया सुरक्षात्मक मापदंडांना पुन्हा नव्याने पारिभाषित करत आहे. एक मानक वैशिष्ट्य म्हणून 6 एअरबॅग्ज देत नव्या सोनेटने कियाचे स्थान आणखीच भरभक्कम केले आहे, जो आपल्या सर्व वाहनांमध्ये 6 ते 8 एअरबॅग्ज देणारा सर्वात युवा ब्रँड ठरले आहे.

Kia Sonet Facelift चे बेस्ट फिचर्स

  • 5 एमटी इन एचटीई, एचटीके आणि एचटीके+ आवृत्त्यांत स्मार्टस्ट्रीम जी 1.2 इंजिन
  • पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हर्जनमध्ये 6 आय एमटी
  • पेट्रोल व्हर्जनमध्ये 7 डीसीटी, आणि डिझेल व्हर्जनमध्ये 6 एटी
  • सर्वात सुरक्षित आणि सुविधाजनक कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारपैकी एक 
  • फ्रंट कोल्यूजन वॉर्निंग
  • फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट पेडस्टेरियन 
  • फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट सायकलिस्ट
  • फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट कार
  • लीडिंग व्हेइकल डिपार्चर अलर्ट
  • लेन डिपार्चर वॉर्निंग
  • लेन कीप असिस्ट
  • लेन फॉलोइंग असिस्ट
  • हाय बीम असिस्ट
  • ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग
  • फ्रंट ड्युअल एअरबॅग्ज
  • फ्रंट सीट साइड एअरबॅग्ज
  • साइड कर्टन एअरबॅग्ज
  • अँटी-लॉक ब्रेक सिस्टिम (एबीएस)
  • ब्रेक फोर्स असिस्ट सिस्टिम (बीएएस)
  • रिअर पार्किंग सेन्सर्स