LDL cholesterol Reducing Tips : हा ब्लू चहा नसांमध्ये साचलेली घाण काढण्यास करेल मदत, एलडीएल कोलेस्ट्रॉलवर नैसर्गिक आणि घरगुती उपाय

Aparajita flower tea Benefits : ग्रीन टीनंतर आता निळा रंगाचा चहा ट्रेंडिंगमध्ये आहे. हा निळा चहा वाईट कोलेस्ट्रॉलचा नाश करण्यास मदत करतो. शिवाय या निळ्या रंगाच्या चहाच्या सेवनाने वजन कमी होण्यास फायदा मिळतो.   

नेहा चौधरी | Updated: Jun 21, 2024, 12:49 PM IST
LDL cholesterol Reducing Tips : हा ब्लू चहा नसांमध्ये साचलेली घाण काढण्यास करेल मदत, एलडीएल कोलेस्ट्रॉलवर नैसर्गिक आणि घरगुती उपाय title=
LDL Cholesterol Reducing Tips aparajita flower blue tea reducing cholesterol home remedies in marathi

Aparajita flower tea Benefits : शंभरातून 90 टक्के लोकांना आज कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. डॉक्टरांनुसार प्रत्येकाच्या शरीरात चांगले आणि वाईट असे कोलेस्ट्रॉल असतं. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास रुग्णांला अनेक गंभीर आजाराचा सामना करावा लागतो. बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याचा सवयीमुळे अनेक आजारांनी आपण ग्रासलोय. खराब कोलेस्ट्रॉलचा त्रास असल्याने शिरांमध्ये चरबी जमा होते. या चरबीचा नाश करण्यासाठी सध्या निळा रंगाचा चहा ट्रेंडिंगमध्ये आहे. ग्रीन टीनुसारच आता ब्लू टी वजन कमी करण्यापासून कोलेस्ट्रॉलचा नशा करण्यासाठी फायदेशीर आहे, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. (LDL Cholesterol Reducing Tips aparajita flower blue tea reducing cholesterol home remedies in marathi )

काय आहे निळा चहा?

हा निळा चहा म्हणजे अपराजिता फुलाच्या पानांपासून बनवला चहा आहे. फक्त चहा प्यायल्याने हे खराब चरबी रक्तवाहिन्यांमधून साफ ​​होण्यास मदत मिळते असं तज्ज्ञांचा दावा आहे. हे रक्तवाहिन्यांमधून चरबी काढून टाकतं आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत मिळते, असं सांगण्यात आलंय.

अपराजिता फ्लॉवर टीचे फायदे!

कोलेस्ट्रॉल कमी करण्यात प्रभावी

अपराजिता चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे नसांमध्ये जमा होणारे खराब कोलेस्ट्रॉल कमी मदत करतं. हे नसांमध्ये उष्णता निर्माण करून खराब कोलेस्टेरॉल लिपिड्स वितळवते आणि हे एलडीएल पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरतं. त्याच वेळी एचडीएल पातळी वाढण्यासही मदत मिळते. 

रक्तदाब नियंत्रित करते

अपराजिता चहामुळे उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास फायदेशीर ठरते. हे कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहते. याशिवाय ते हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे असं तज्ज्ञ सांगतात. यात व्हॅसोरलेक्सेशन गुणधर्म आहेत, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होते

उच्च कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत अपराजिताच्या पानांचा चहा प्यायल्याने हृदय आणि मज्जातंतू निरोगी राहण्यास मदत मिळते. यामध्ये आढळणारे अँटीथ्रोम्बोटिक रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यास फायदेशीर ठरते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात. हृदयरोगींनी अपराजिता चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. 

अपराजिता चहा कसा बनवायचा?

अपराजिताच्या फुलांपासून चहा बनवणे खूप सोपे असून यासाठी पहिल्यांदा दोन ते तीन अपराजितांची फुलं घेऊन ती वाळवा. नंतर ते गरम पाण्यामध्ये चांगले उकळवा. पाणी निळे दिसू लागले की ते एका कपात गाळून घ्या आणि त्यात मीठ, लिंबू आणि साखर घालून त्याच सेवन करा. साखर ऐवजी तुम्ही मधही टाकू शकता. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)