मुंबई : जर तुम्ही अँड्रॉईड यूजर्स असाल तर नवा फोन खरेदी केल्यानंतर तो काही महिन्यांमध्ये स्लो झाल्याचे तुम्हाला जाणवले असेल. एखाद्या अॅपवरुन तुम्हाला दुसऱ्या अॅपवर जायचे असेल अथवा होम स्क्रीनवर जर परतायचे असेल तर फोन अधिक वेळ घेतो. फोन स्लो न होण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही महत्त्वाच्या ट्रिक्स....
तुमच्या फोनमध्ये इंटरनल मेमरी असते. फोनच्या इंटरनल मेमरीमध्ये जितकी जास्त स्पेस असेल तितकाच तुमचा फोन चांगलं काम करेल. अनेकदा फोनच्या इंटरनल मेमरीमध्ये फोटोस, म्युझिक तसेच अॅप भरलेले असतात यामुळे फोन स्लो होतो.
१. फोनमध्ये एखादे पेंडिंग अपडेट असेल तर ते काम आधी करुन घ्या. सेटिंगमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेटच्या सहाय्याने तुम्ही फोन अपडेट करु शकता.
२. वॉलपेपर फोनमधील अधिक जागा व्यापतात. यामुळे तुमचा डिव्हाईस स्लो होऊ शकतो. लाईव्ह वॉलपेपर असल्यास त्याच्या जागी केवळ इमेज ठेवा.
३. फोनमधील जंक फाईल्स तसेच कॅशे फाईल्सना वेळोवेळी डिलीट करत जा.
४. डिव्हाईसमधील ड्युप्लिकेट कॉन्टॅक्ट अनेकदा स्टोर होतात. त्यांना डिलीट करा.