Aadhaar Authentication: युनिफाइड मोबाईल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स म्हणजेच उमंग अॅप (UMANG) द्वारे तुम्ही केंद्र सरकार (Central Government) राज्य सरकार (state government) आणि स्थानिक सरकारी सेवांचा सहज लाभ घेऊ शकता. यापूर्वी लोकांना आधार कार्ड संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
आता सरकारने उमंग अॅपशीही जोडले आहे. आता तुम्ही फक्त उमंग अॅपद्वारे आधारशी संबंधित अनेक सेवांचा लाभ घेऊ शकाल. यासाठी तुम्हाला उमंग अॅपवर काय करावे लागेल? तुम्हाला येथे कोणती सेवा मिळेल? जाणून घ्या...
या सेवांचा लाभ घ्या
1. UMANG अॅपवर नागरिक आधार पडताळणी करू शकतील.
2. तुम्ही तुमची आधार नोंदणी किंवा अपडेट विनंती स्थिती तपासू शकता.
3. आधारसोबत नोंदणीकृत मोबाईल आणि ईमेलची पडताळणी करता येते.
4. तुमचा नावनोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक मिळवू शकता, म्हणजेच तुम्ही आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी (EID) शोधण्यासाठी ही सेवा वापरण्यास सक्षम असाल.
तुम्हीही या सुविधांचा लाभ घेऊ शकता
याशिवाय तुम्ही प्रमाणीकरण इतिहास तपासू शकता. बायोमेट्रिक्स लॉक किंवा अनलॉक करू शकता. आधार डाउनलोड करू शकता. ऑफलाइन ई-केवायसी करू शकता. व्हर्च्युअल आयडी जनरेट करू शकता. पेमेंट इतिहास, उमंग एएमपीवर नावनोंदणी आणि अद्यतन स्थिती, ईआयडी/आधार क्रमांक प्राप्त करणे, पडताळणी करणे, आधार आणि पडताळणी ईमेल/मोबाइल नंबर. या अॅपवर तुम्ही या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.