'या' ट्रिकने व्हॉट्सअॅपवर हाईड केलेले लास्ट सीनही पाहू शकाल....

व्हाट्स अॅपवर तुम्ही एखाद्याला मेसेज केला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 2, 2017, 02:42 PM IST
'या' ट्रिकने व्हॉट्सअॅपवर हाईड केलेले लास्ट सीनही पाहू शकाल....  title=

नवी दिल्ली : व्हाट्स अॅपवर तुम्ही एखाद्याला मेसेज केला. मात्र लगेच त्या व्यक्तीचा रिप्लाय न आल्यास त्याच्या रिप्लायची वाट बघत सतत ऑनलाईन यावे लागते. त्यात जर त्या व्यक्तीचे लास्ट सीन हाईड असेल तर मात्र ही प्रतीक्षा अधिक कठीण होते. मात्र या सगळ्यावर उपाय आहे. व्हाट्स अॅपवर अशी एक ट्रिक आहे. जिच्या मदतीने तुम्ही कोणालाही ट्रॅक करू शकता. त्याचबरोबर लास्ट सीन देखील पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला WhatsAgent हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. 

WhatsAgent कसं काम करतं ?
हे एक फ्री अॅप आहे. हे तुम्ही प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकता. हे वापरणे देखील सोपे आहे. यामुळे तुम्ही एकाच वेळी दोघांना ट्रॅक करू शकता. अॅप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणाला ट्रॅक आहे त्याचा मोबाईल नंबर   टाका. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन-ऑफलाईन पासून ते लास्ट सीन ही सगळी माहिती मिळेल. तुम्ही ज्या व्यक्तीला ट्रॅक करत आहात ती व्यक्ती ऑनलाईन आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. 

स्टेप १:
अॅप डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडून परवानगी मागितली जाईल, ती Allow करा. 
स्टेप २:
त्यानंतर ज्या व्यक्तीला ट्रॅक करायचे आहे, त्या व्यक्तीचा नंबर इंटर Follow वर क्लिक करा. येथे तुम्ही २ नंबर टाकू शकता. 
स्टेप ३:
त्यानंतर जे नंबर तुम्ही अॅड केले आहे. ती व्यक्ती ऑनलाईन आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा लास्ट सीन देखील दिसेल.