X Down: एक्स म्हणजे पुर्वीच्या ट्विटर संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आज सकाळपासून एक्स यूजर्सना पोस्ट दिसण्यासंदर्भात अडचणी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एलोन मस्कचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) डाउन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 21 डिसेंबरच्या सकाळपासून, X युजर्स कोणतीही पोस्ट पाहू शकत नाहीत. वेरिफाइड आणि नॉन-व्हेरिफाईड अशा दोन्ही युजर्सना ही समस्या भेडसावत आहे.
एक्स अकाऊंट ओपन केल्यावर युजर्सना, आपले स्वागत आहे लिहिलेले दिसते. पण त्यानंतर पोस्ट दिसत नाहीत. मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्ही युजर्सना ही समस्या भेडसावत आहे. सध्या कुणाच्या प्रोफाईलवर गेल्यावरही त्या युजरच्या पोस्ट दिसत नाहीत. टाइमलाइनवर कोणतेही व्हिडीओ आणि पोस्ट दिसत नाहीत.
एक्सचा सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे त्याची सेवा बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातील 8 शहरांमध्ये एक्सची सेवा ठप्प झाली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबादसारख्या शहरांमध्ये एक्सची सेवा विस्कळीत झाल्याचं समजतंय.. भारतासह अनेक देशांमध्ये युझर्सना एक्स वापरण्यासाठी समस्या येतायत.. एक्सची टाईमलाईन दिसत नसल्याची तक्रार अनेकांनी केलीय.
Downdetector ने देखील X डाऊन असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अवघ्या काही मिनिटांत 2,500 वापरकर्त्यांनी डाउनडिटेक्टरवर तक्रार केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे #TwitterDown हे X वर ट्रेंडीग आहे. पण त्यावर क्लिक केल्यानंतर कोणतीही पोस्ट दिसत नाही म्हणजेच यूजर्स X वर पोस्ट करू शकतात पण पोस्ट पाहू शकत नाहीत.
दरम्यान 12.15 च्या सुमारास एक्स अकाऊंट पुन्हा सुरु होताना दिसू लागली आहेत. यामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.