YouTube : फक्त 15 सेकंदाचा Video तुम्हाला करणार मालामाल, आजचं करा 'हे' काम

Trending News : YouTube पैसे कमविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. एक छोटासा व्हिडीओ शेअर करा आणि मालामाल व्हावा. त्यासाठी तुम्हाला आजच एक महत्त्वाचं काम करायचं आहे. 

Updated: Jan 11, 2023, 08:31 AM IST
YouTube : फक्त 15 सेकंदाचा Video तुम्हाला करणार मालामाल, आजचं करा 'हे' काम title=
YouTube Shorts Video Users will be rich earn money Monetize your YouTube Channel Fill the form on 10 January 2023 marathi news

YouTube Video : सोशल मीडिया (Social media Video) हे जेवढं मनोरंजनाचं साधन आहे. त्याशिवाय त्यातून तुम्ही लाखो रुपये कमावू शकतात. जर तुम्हाला सोशल मीडियावरुन पैसे कमवायचे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. व्हिडीओ स्ट्रीमिंग (Video streaming) प्लॅटफॉर्म YouTube कमाईचा एक नवीन पर्याय घेऊन आले आहेत. त्या माध्यमातून तुम्ही मालामाल होऊ शकतात. फक्त त्यासाठी तुम्हाला आजच्या आज हे काम करणं गरजेचं आहे.  काय आहे ते काम आणि नेमकं काय करायचं आहे ते आपण जाणून घेऊयात. 

YouTube Video करा आणि व्हा मालामाल

यूट्यूब शॉर्ट्स व्हिडीओद्वारे तुम्ही पैसे मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त 15 सेकंदांचा एक व्हिडीओ तयार करायचा आहे. YouTube ने शॉर्ट्स व्हिडीओसाठी मॉनिटायजेशन सुरू केलं आहे. यासाठी तुम्हाला तीन गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. (YouTube Shorts Video Users will be rich earn money Monetize your YouTube Channel Fill the form on 10 January 2023 marathi news)

काय आहे कमाईचा फॉर्म्युला?

पहिले तर तुमचे सबस्क्रायबर्स (Subscribers) जास्त असायला हवेत. या सबस्क्रायबर्सनुसार तुम्हाला व्हिडीओला जाहिरात (Advertising) दिली जाणार. दुसरं म्हणजे शॉर्ट व्हिडीओचा वॉच टाइम किती आहे ते पाहिलं जाईल. तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एखाद्या ब्रँडचा (brand) प्रचार करुन कमाई करण्याची संधी. 

YouTube Shorts कसे मालामाल व्हाल 

YouTube Shorts कमाई करण्यासाठी 1 फेब्रुवारी 2023 ही तारीख लक्षात ठेवा. कारण यादिवशी YouTube Shorts वर कमाई करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यानंतर यूजर्सला शॉर्ट जाहिरात कमाईचा टर्म आणि कंडिशन फॉर्म (Term and condition form) भरावा लागेल. विशेष म्हणजे सर्व भागीदारांना यासाठी नवीन YouTube भागीदार कार्यक्रमाच्या सर्व अटी स्वीकाराव्या लागतील. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर पैसे कमाई करु शकणार नाहीत. त्यामुळे आजच्या आज हा फॉर्म भरा. शिवाय जर तुम्ही असं नाही केल्यास तुमचं Youtube चॅनेल या कमाईच्या करारतून बाद होईल. 

म्हणून कमाईची ही संधी न गमावता, जर तुम्ही YouTube शॉर्ट्स व्हिडीओचे कंटेंट क्रिएटर असाल तर ताबडतोब YouTube चा टर्म आणि कंडिशन फॉर्म भरा आणि या वर्षात छप्पर फाड कमाई करा. दरम्यान YouTube शॉर्ट मॉनिटायजेशन प्रोग्राम मार्च 2023 पासून लागू केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.