'राम कदमांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये मिळवा'

मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी.

Updated: Sep 6, 2018, 05:38 PM IST
'राम कदमांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये मिळवा'

बुलडाणा: महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्यावर अजूनही चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सुरु आहे. राम कदम यांनी बुधवारी रात्री व्हीडिओ प्रसिद्ध करून जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतरही लोकांचा राग शमलेला नाही. या वादात आता राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी उडी घेतली आहे. 

राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये बक्षीस मिळवा, असे सावजी यांनी जाहीर केले आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले. सावजी यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे विरोधकांनी राम कदम यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, ही मागणी लावून धरली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी महिला संघटनांकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्या पोस्टरला चपलांचा मार देण्यात आला. तर विरोधकांनीही या प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे.