कोल्हापूर : कोरोनामुळे समाजातील किर्तीवंत लोकांचेही निधन होत आहे. समाजाच्या भल्यासाठी ऑक्सिजन क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन करणारे मराठमोळे संशोधक डॉ. भालचंद्र काकडे यांचं चैन्नई येथे निधन झालं.
कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने नामवंत हिरे समाजातून गळून पडत आहेत. तशीच एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणजेच डॉ. भालचंद्र काकडे होय. त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुरातून रसायनशास्त्रात पदवी घेतली होती.
डॉ. काकडे यांच्या रसायनशास्त्रातील संशोधनामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून ख्याती होती. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चैन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात डॉ. काकडे यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. रुग्णालयातील ऑक्सिजन पूरवठा संपल्याने डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.