ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 13, 2024, 11:25 AM IST
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास  title=

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी प्रभा अत्रे यांनी अखेरचा श्वास घेतला. जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यातील राहत्या घरी पहाटे निधन झाल आहे. 

प्रभा अत्रे यांना पहाटे झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांच निधन झाल होतं. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  पद्मश्री,  पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आल होतं. 

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचं निधन झाल होतं. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा 'पद्मश्री', 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. तसेच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.  प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदरांजली 

प्रभा अत्रे यांच्याविषयी 

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील डॉ. प्रभा अत्रे हे एक लोकप्रिय नाव आहे. एवढंच नव्हे तर त्या स्वतः कलाकार, संगीतकार, लेखिका आणि संगीत या क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांना या चारही क्षेत्रात रुची होती. प्रभा अत्रे या हिंदुस्तानी शास्त्रीय परंपरेतील प्रमुख गायिका म्हणून ओळखल्या जातात. महत्त्वाचं म्हणजे वैश्विक स्तरावर भारतीय शास्त्रीय संगीत लोकप्रिय बनवण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. डॉ. प्रभा अत्रे या दुर्मिळ कलाकारांपैकी एक आहे ज्यांना संगीतातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलं आहे. जसे की, खयाल, ठुमरी, दादरा, गझल, गीत, नाट्यसंगीत, भक्ती गीत यांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं. 

पुण्यात जन्मलेल्या प्रभा अत्रे यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांनी गुरुशिष्य परंपरेनुसार शिक्षण घेतले. प्रभा अत्रे, संगीतातील तज्ञ, विज्ञानातील पदवीधर आहेत. त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. त्या गांधर्व शाळेतील संगीत अलंकार आहेत. याव्यतिरिक्त, त्याच्याकडे संगीत डॉक्टरेट पदवी देखील आहे. त्यांनी लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये पाश्चात्य संगीताचे देखील शिक्षण घेतले आहे.