मासिक पाळीत शरीराला खाज येते? पण का...जाणून घ्या कारणं

मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊया मासिक पाळीमध्ये महिलांच्या शरीराला खाज का येते?

Updated: Feb 22, 2022, 03:28 PM IST
मासिक पाळीत शरीराला खाज येते? पण का...जाणून घ्या कारणं title=

मुंबई : अनेक महिलांची ही समस्या असते की मासिक पाळीच्या काळामध्ये काही वेळा शरीराला सतत खाज येऊ लागते. ही समस्या तेव्हा उद्भवते ज्यावेळी महिला पिरीयड्सच्या दिवसांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. शरीराची स्वच्छता न राखल्यामुळे शरीराला सूज येण्याची समस्या निर्माण होते. त्याचसोबत त्वचा लाल होणं, रॅशेज, खाज येण्याच्या तक्रारीही उद्भवतात. 

जर तुम्हालाही या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊया मासिक पाळीमध्ये महिलांच्या शरीराला खाज का येते?

खाज येण्याचं कारणं

  • जर पिरीयड्समध्ये जास्त प्रमाणात तेलकट खाल्लं तरी देखील शरीराला खाज येण्याची तक्रार निर्माण होऊ शकते.
  • मासिक पाळीच्या काळात शरीरात एस्ट्रोजन हार्मोनची पातळी कमी होते. यामुळे शरीराला केवळ सूज येण्याची नव्हे तर खाज येण्याचीही तक्रार येते.
  • या काळात हार्मोन्स असंतुलनामुळे खाज येण्याची समस्या उद्भवू शकते.

या समस्येपासून कसा बचाव करावा

  • स्वच्छतेवर पूर्ण लक्ष द्या
  • वेळोवेळी पॅड बदललं पाहिजे.
  • तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळावं.
  • योनिमार्ग साफ ठेवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा
  • कॉटनच्या कपड्यांचा वापर करा