जागतिक महिला दिन : Google आणि Facebook चा खास लोगो पाहून व्हाल एकदम खूश

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. (International Women's Day) या दिनाच्या विशेष प्रसंगी टेक दिग्गज कंपनी गूगल (Google) आणि फेसबूकने (Facebook) महिलांना समर्पित केले आहे. 

Updated: Mar 8, 2021, 10:25 AM IST
जागतिक महिला दिन : Google आणि Facebook चा खास लोगो पाहून व्हाल एकदम खूश
सौजन्या । गूगल

मुंबई : आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. (International Women's Day) या दिनाच्या विशेष प्रसंगी टेक दिग्गज कंपनी गूगल (Google) आणि फेसबूकने (Facebook) महिलांना समर्पित केले आहे. गूगल डूडल्सला (Doodles) आज महिला बरोबरीसाठी समर्पित केले आहे. तर फेसबूकने आपल्या मोबाइल अ‍ॅपमध्ये हा लोगो विविध महिलांना समर्पित केला आहे.  

गूगल डूडल्सकडून असे महिला सशक्तीकरण

गूगलने आपल्या डूडलच्या (Doodles) माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनी खास समर्पित केले आहे.  गूगलने आपल्या मुख्य पानावर Doodles तयार करुन आज प्रथम महिलांना शिक्षण, नागरी हक्क आणि विज्ञान या क्षेत्रात प्रवेश करण्यास समर्पित केले आहे. या व्यतिरिक्त गूगलने म्हटले आहे की, आज महिला अकादमी आणि व्यवसाय या क्षेत्रातही चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांना समर्पित केले आहे.

फेसबूकचा महिलांना समर्पित केला लोगो

फेसबूकने आजचा हा खास दिवस जगभरातील महिलांना समर्पित केला आहे. फेसबूकच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये जीआयएफ (GIF) लोगो तयार करण्यात आला आहे. यात महिलांना वेगवेगळ्या वेशभूषा दाखवल्या आहेत. हे महिलांच्या ऐक्याचे प्रतीक मानले जाते.

८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीसाठी हा विशेष दिवस महिलांनी समर्पित केला आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या आव्हानांना समर्पित केला. मिळालेल्या माहितीनुसार, महिला दिन कोरोना विषाणूच्या साथीच्या आव्हानांना समर्पित करण्यात आला आहे.

हिला कर्मचार्‍यांना सुट्टी जाहीर

तेलंगणा राज्य सरकारने ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्व महिला कर्मचार्‍यांना सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही रजा देण्याचे निर्देश जारी केले आहेत.