मुंबई : नाचणीची भाकरी आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर नाचणीची भाकरी कधीही चांगली. वरील व्हिडीओ हा गुजरातमधील पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सापुतारा येथील आहे.
गुजरातमधील काही खेड्यांमध्ये, तसेच खान्देशात काही खेड्यात आजही नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जाते. एका प्रदर्शनातील हा व्हिडीओ आहे, की नाचणीची भाकरी कशी बनवली जाते.
नाचणीची भाकरी तुम्हाला माहित असेलच, नाचणीची बिस्कीट लहान मुलांना दिली जातात, त्यापेक्षा लहान मुलं जेव्हा खायला लागतात, तेव्हा त्यांना नाचणीची भाकरी खायला देणं कधीही सर्वोत्तम आहे. उत्तर महाराष्ट्रात नाचणी म्हणजेच नागलीचे पापड देखील असतात. मराठीत नाचणी, गुजराती आणि आहिराणीत नाचणीला नागली म्हणतात, तर हिंदीत रागी म्हणतात.
नाचणीच्या भाकरीत प्रचंड प्रमाणात कार्बोहाड्रेडस, प्रोटीन्स, फायबर्स असतात, यानंतर सर्वात कमी फॅटस, एवढंच नाही नाचणीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम, आयर्न देखील असतं.
नाचणी खाल्याने शरीरात अॅमिनो अॅसिडची निर्मिती होते, अॅमिनो अॅसिड मानवी शरीरासाठी आवश्यक असते, यातील व्हॅलिन शरीरातील टिश्यूची होणारी हानी भरून काढतं, मासंपेशी आणि चयापचय यांच्यातील संवाद आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करतं, शरीरातील नायट्रोजनची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते.
तसेच मानसिक शांतता, तसेच मानसिक विचार करण्याच्या, आकलन करण्याच्या शक्तीत वाढ करते. शरीरातील रक्ताचं समतोल, आणि शरीरातील साखरेची पातळी वाढू नये, यावर देखील नाचणीतील पोषक तत्वे महत्वाची असतात. हाडं आणि त्वचा यासाठी देखील नाचणी महत्वाची असते.