Relationship Tips : पार्टनर तुम्हाला 'असा' धोका देतोय? कसे जाणून घ्यायचे...

Boyfriend Girlfriend Relation : नातेसंबंध जपताना (Relation) प्रत्येकाळा काळजी घ्यावी लागते. प्रेमात पडल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्ने पाहू लागता, पण तुमचा पार्टनर त्या नात्याबाबत तितकाच गंभीर असतो का?  प्रेम हे कोणत्याही वयात होऊ शकते, पण जर तुम्हाला ही भावना तरुण वयात येत असेल, तर तुम्ही थोडे सावध असले पाहिजे. कारण 

Updated: Feb 25, 2023, 11:09 AM IST
Relationship Tips : पार्टनर तुम्हाला 'असा' धोका देतोय? कसे जाणून घ्यायचे... title=

Relation Advice : नातेसंबंध जपताना प्रत्येकाळा काळजी घ्यावी लागते. जर ही काळजी घेतली नाही तर तुमचे नातेसंबंध (Relation) लवकरच संपुष्टात येतात. त्यामुळे तुमचा पार्टनर धोका देताना टाईमपास करत नाही ना, हे जाणून घेताना एक काळजी घ्यावी. (Boyfriend Girlfriend Relation) आजकाल प्रेमात फसवणूक करणे सामान्य आहे, परंतु हे लवकर समजत नाही. तुमचा पार्टनर तुमच्यासोबत टाईमपास करत नाही हे कसे ओळखायचे, ते जाणून घ्या?  (Relationship Tips )

आजकाल एखाद्यावर पटकन प्रेम जडते आणि नंतर स्वाभाव समजल्यानंतर नात्यात दुसारा येतो. जर तुम्ही एखाद्यासोबत प्रेमसंबंधात (Boyfriend Girlfriend Relation) असाल तर तेव्हा तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता. ती व्यक्ती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती बनते. तुमचे सर्व कार्य आणि विचार त्यांच्याभोवती फिरत असतात. तुम्ही मोठ मोठी स्वप्न पाहात असतात. परंतु कधी कधी पार्टनर तुम्हाला धोका देत असतो. तो टाईमपास करत असतो. हे जेव्हा समजते. त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.

 प्रेमात पडल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्ने पाहू लागता, पण तुमचा पार्टनर त्या नात्याबाबत तितकाच गंभीर असतो का?  प्रेम हे कोणत्याही वयात होऊ शकते, पण जर तुम्हाला ही भावना तरुण वयात येत असेल, तर तुम्ही थोडे सावध असले पाहिजे. कारण या वयात परिपक्वतेचा अभाव असतो आणि अनेकदा आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही, हे फसवणूक झाल्यानंतर कळते. त्यावेळी तुमच्या हातातून वेळ निघून गेलेली असते. तुमच्या प्रेमाची वेळोवेळी परीक्षा घेणे आवश्यक आहे, कारण ज्या व्यक्तीसाठी तुम्ही भविष्याची योजना आखत आहात, त्यांच्यासाठी तुम्ही फक्त टाईमपास असू शकता. ते कसे शोधायचे ते जाणून घ्या.

जोडीदाराच्या मनात नेमके काय चालले आहे, हे कसे ओळखायचे?

1.भांडण झाले आणि ... 

प्रेमात पडल्यानंतर जोडीदारासोबत कधी ना कधी भांडण हे होतेच. काहीही कारण नसतानाही भांडण होते. किंवा एखादे छोटे कारणही भांडणासाठी पुरेसे असते. मात्र, भांडण झाले आणि भांडणानंतर जोडीदाराने कधीच पुढाकार घेतला नाही तर समजून   जा. जिथे प्रेम, प्रेम आणि आपुलकी असते तिथे किरकोळ भांडणे होतात, पण एकाने पुढे जाऊन दुसऱ्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे गोष्टी सोप्या होतात आणि दुरावाही कमी होतो. जी व्यक्ती तुमच्या अहंकारापेक्षा मोठी आहे, म्हणून त्याला मिळवण्यासाठी सर्व काही बाजूला ठेवले जाते. जर तुम्ही प्रत्येक वेळी पॅच अप करण्याचा प्रयत्न करत असाल तर समजून घ्या की ती व्यक्ती रिलेशनशिपबाबत काही प्रयत्न करत नाही.

2. असं काही घडत असेल तर सावध व्हा...

तुमचा जोडदार तुम्हाला फसवत नाही ना, हे लक्षात घ्या. गर्लफ्रेंड किंवा तुमचा बॉयफ्रेंड एकत्र क्वालिटी टाइम घालवण्यास वेळ देत नसेल तर समजून जा. त्याला तुमची कंपनी जास्त आवडत नाही. कारण एखादी व्यक्ती कोणावर तरी खूप प्रेम करते. तो नक्कीच तिच्यासोबत फुरसतीचा वेळ घालवतो का? की वेळ मिळेल तेव्हा तो ती संधी शोधत राहतो आणि त्याच्या जोडीदाराकडे जाऊ शकतो. जर तसे नसेल तर तो केवळ तुमच्यासोबत टाईमपास करत आहे.

3. पार्टनर याकडे लक्ष देत नसेल तर...

प्रेमात पडल्यानंतर एकमेकांना वेळ दिला पाहिजे. जर असं काही होत नसेल तर काहीतरी काळेबेरे असते. तसेच तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर तुम्ही समजून जा, की तो टाईमपास करत आहे. जोडीदाराचे शब्द कितीही अनावश्यक आणि मजेदार वाटत असले तरी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रेमासाठी लक्ष खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याला महत्त्व देत नसाल तर ते नात्यासाठी चांगले नाही. जर तुमचा पार्टनर तुमच्या बोलण्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असेल तर त्याला तुमच्यासाठी वेळ नाही.