Women health : Pubic hair शेव्ह करणं तुमच्या आरोग्यासाठी कितपत योग्य?

 प्युबिक हेअर काढण्याकडे मुलींचा कल अधिक दिसून येतो. मात्र आपल्या शरीरावर नैसर्गिकरित्या असलेले हे केस काढणं किती योग्य आहे.

Updated: Dec 20, 2022, 07:25 PM IST
Women health : Pubic hair शेव्ह करणं तुमच्या आरोग्यासाठी कितपत योग्य?  title=

Shaving Pubic Hair: अनेक महिला गुप्तांगावरील केस (Pubic Hair) काढू इच्छितात. प्युबिक हेअर काढण्याकडे मुलींचा कल अधिक दिसून येतो. असं केल्याने गुप्तांग स्वच्छ राहतं आणि लैगिंक संबंधासाठीही (Physical Relation) ते सोयीस्कर असतं, असंही महिलांच्या मनात असतं. मात्र आपल्या शरीरावर नैसर्गिकरित्या असलेले हे केस काढणं किती योग्य आहे.

प्युबिक हेअर शेविंगला किंवा वॅक्सिंगला आजच्या मॉडर्न पद्धतीप्रमाणे, ‘गृमिंग’चा एक अविभाज्य भाग मानलं जातं. मात्र निसर्गाने आपल्याला एखादी जर गोष्ट दिलीये तर तिचा आपल्या शरीरासाठी काही ना काही उपयोग नक्कीच होत असणार, याचीही आपण जाणीव ठेवली पाहिजे.

महिलांच्या शरीराच्या रचनेप्रमाणे त्याची गरज असते. प्युबिक हेअर हे अनावश्यक नाही तर त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून संरक्षण मिळतं. शिवाय यामुळे प्रजनन करण्याच्या अवयवांचं तापमान नीट राखलं जातं.

प्युबिक हेअर काढताना महिलांनी कितीही काळजी घेतली तरी काही प्रमाणात छोटी दुखापत होतेच. त्या ठिकाणी दुखापत झाल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो. काही संशोधनानुसार असं लक्षात आलंय की, प्युबिक हेअर काढल्याने सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीजचा धोकाही बळावतो.

प्युबिक हेअर जर तुम्ही वॅक्सच्या मार्फत काढत असाल तर त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्वचेवरील छिद्रं नीट काम करत नाहीत. शिवाय या अवयवांजवळ बॅक्टेरियांची निर्मिती होण्याचा धोकाही वाढतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, शरीरावर केस असणं चांगलं आहे. या केसांच्या माध्यमातून त्वचेचं संरक्षण होतं. या केसांमुळे अस्वच्छता थेट गुप्तांगाला हानी पोहोचू देत नाही. प्युबिक हेअर काढण्यापेक्षा ते स्वच्छ ठेवले पाहिजे.

प्युबिक हेअर ट्रिम करताना इतरांची मदत घेऊ नका

तुमची त्वचा अवयवांचा तुम्हाला जास्त चांगला अंदाज असतो आणि मुळात ती जागा अतिशय संवेदनशील असते म्हणून इतर कोणाला सांगण्यापेक्षा स्वतः स्वच्छ केलात तर केव्हाही उत्तम 

रेझर वापरात असाल तर घ्या काळजी 

जर तुम्ही प्यूबिक हेअर  काढत असाल आणि त्यासाठी रेझर वापरत असाल तर त्यासाठीच रेझर नेहमी वेगळं ठेवा इतर वेळी ते नका वापरू, हे रेझर नेहमी कोरड ठेवा आणि स्वच्छ ठेवत जा शेविंग नंतर आपल्या त्वचेला मॉइस्चरायझर लावायला विसरू नका. 

आपली हेअर रेमूव्हल किट नेहमी वेगळा ठेवा 

तुम्ही वापरलेली शेव्हिंग  किंवा वॅक्सीन ची साधन  देऊ नका आणि तुम्हीसुद्धा इतर कोणाची वापरू नका. कारण इतरांनी वापरलेलं तुम्ही वापरलात तर तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. आणि लैंगिक संसर्गसुद्धा होऊ शकतो.