योनीमार्गाच्या आरोग्यासाठी Good Bacteria गरजेचे; हे फूड्स करतील मदत

तुमचा आहार तुमच्या योनीमार्गाच्या आरोग्यासाठी मोठी भूमिका बजावतो.

Updated: Mar 25, 2022, 02:58 PM IST
योनीमार्गाच्या आरोग्यासाठी Good Bacteria गरजेचे; हे फूड्स करतील मदत title=

मुंबई : तुमचा आहार तुमच्या योनीमार्गाच्या आरोग्यासाठी मोठी भूमिका बजावतो. जर तुमचा आहार चागंला आणि समृद्ध असेल तर चांगले बॅक्टेरिया योनीच्या चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकतात. योनिमार्गातील बॅक्टेरियाचं संतुलन ही प्रत्येकासाठी मोठी चिंता असते. कारण तुमच्या योनीमार्गात घडणाऱ्या सर्व चांगल्या-वाईट गोष्टींना हे संतुलन जबाबदार असते. 

योनिमार्गाच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही चांगल्या बॅक्टेरियाला कसं प्रोत्साहन देऊ शकता? यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता.

प्रोबायोटिक्स

नियमित स्वरूपात जर तुम्ही प्रोबायोटीक्सचं सेवन करत असाल तर तुम्हाला पीएच स्तर आणि बॅक्टेरियाचं चांगलं संतुलन राखण्यास मदत होते. त्यासोबत इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात. 

लसूण

लसणाचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक प्रभाव पाडत असल्याचं अनेक अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, लसूण तुमच्या योनीसाठी चांगल्या बॅक्टरियांना प्रोत्साहन देऊ शकतं. 

फायबर

फायबर युक्त आहार तुमच्या योनीच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. फळं, भाज्या, शेंगा, धान्य यांसारखे जास्त फायबर असलेले पदार्थ प्रोबायोटिक्स आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रोबायोटिक्स आतड्यांतील बॅक्टेरियासाठी आवश्यक आहेत, जे संपूर्ण शरीर निरोगी आणि संतुलित ठेवण्यास मदत करतात.