इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर शहरात ऑईल टँकर पलटी झाल्याने लागलेल्या आगीत तब्बल १२३ जणांचा मृत्यू झालाय. तर १००हून जण जखमी झालेत.
कराचीहून लाहोरच्या दिशेने जात असताना अहमदपूर येथे हा टँकरला अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार टायर फुटल्याने हा अपघात झाला.
जेव्हा टँकर पलटी झाला तेव्हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल रस्त्यावर सांडले. यावेळी हे पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पलटी झाल्यानंतर १० मिनिटांनी टँकरचा स्फोट झाला. आगीचे मोठ्या प्रमाणात लोळ उठत होते. या आगीत तब्बल १२३ जणांचा मृत्यू झाला.