मुंबई : कॅलियन 6 दिवसांच गोंडस बाळ.
हे बाळ सोशल मीडियावर आताच आहे 'स्टार'. जन्माच्या अगोदरपासूनच या अंकाऊंटला 14 लाख फॉलो करत आहेत. या बाळाच्या जन्माच्या चार दिवसांतच जवळपास 10 लाख लोकांनी केलं कॅलियनला इंस्टाग्राम अकाऊंटवर फॉलो. आणि एका रात्रीत हा मुलगा झाला सोशल मीडियाचा स्टार.
या बाळाचं नाव आहे कॅलियन. आई जेसिका आणि वडिल गॅरिटने आपल्या तिसऱ्या बाळाची आनंदाची बातमी शेअर केली असून इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅलियनच्याच अकाऊंटवरून अपलोड करण्यात आलंय. या सहा दिवसाच्या बाळाचं इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे.
हे गोंडस बाळ कुणा श्रीमंत कुटुंबातील नाही. तर यामध्ये आहे एक स्पेशल शक्ती. कॅलियनचा हा व्हिडिओ जसा त्याच्या आई - वडिलांनी शेअर केला अगदी त्याच्या काही वेळातच तो व्हायरल झाला. या कॅलियनच्या इंस्टा अकांऊटला अक्षरशः लोकांनी पसंत केला. आणि अनेकांनी या अकाऊंटला फॉलो केलं.
कॅलियनचा जन्म अमेरिकेतील राज्य यूटामध्ये झाला. इंस्टाग्रामवर बकेट लिस्ट फॅमिली अकाऊंटवर जवळपास 10 लाख फॉलोवर्स आणि युट्यूबवर पावणे दोन लाख सब्सक्रायबर आहेत.
कॅलियनच्या जन्माच्या अगोदरपासूनच तो सेलिब्रिटी आहे. त्याच्या नावाने आई - वडिलांनी अकाऊंट ओपन केलं तेव्हाच होते 5 लाख लोकं फॉलोअर्स. यामागे आहे खास कारण. ते म्हणजे कॅलियनचे वडिल गेरिटने 2014 मध्ये स्नॅपचॅटला बारकोड स्कॅनर आप जवळपास 3 अरब 50 करोड रुपयाला विकले. तसेच त्यानंतर त्यांनी सर्व प्रॉपर्टी आणि सामान देखील विकलं.
जेसिका आणि गेरिट आपल्या दोन्ही मुलांना घेऊन वर्ल्ड टूरला घेऊन निघून गेला. 3 ते 4 वर्षात या कुटुंबाने जवळपास 50 देशांच्या प्रवास केला आहे. आणि त्या अकाऊंटच नाव 'बकेट लिस्ट फॅमिली' असं नाव ठेवलं आहे.