Aliens News : काही दिवसांपूर्वी मेस्किकोच्या संससेदत एलियनचे (Aliens) कथित मृतदेह सादर करण्यात आले. याते व्हिडिओ देखील व्हायरल झाले. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. मात्र, ही संशोधकांची स्टंटबाजी देखील असल्याचा आरोप झाला. यानंतर या एलियनच्या कथित मृतदेहाचे पोस्टमार्टेम देखील करण्यात आहे. या सर्व घडामोडींवर चर्चा सुरु असतानाच आता एलियनच्या निर्मीतीबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन एलियन जन्माला येत नाहीत असा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून करण्यात आला आहे.
पृथ्वीवर स्त्री आणि पुरुष यांच्या माध्यामातून प्रजजजन प्रक्रिद्वारे मानवाची निर्मीती होते. स्त्रीयांमध्ये गर्भधारमेची क्षमता असते. नऊ महिने गर्भधारणा होवून मानव जन्माला येतो. तर, मानवा प्रमाणे पृथ्वीवरील अनेक सजीव प्राणी देखील अशाच प्रकारे प्रजनन करतात. मात्र, एलियनमध्ये अशा प्रकारे प्रजनन होत नाही अशी धक्कादायक माहिती संशोधनातुन समोर आली आहे.
विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाचे (University of Wisconsin-Madison) खगोलशास्त्रज्ञ बेतुल काकर (Betul Kacar) यांनी याबाबतचे संशोधन करुन एलियनच्या उत्पत्तीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एलियन तयार होण्याची प्रक्रिया मानवाच्या उत्पत्तीपेक्षा वेगळी आहे. संशोधक परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. या दरम्यान एलियनच्या निर्मीतीबाबत महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे.
पृथ्वीवरील जीवसृष्टी सेंद्रिय संयुगांवर (Autocatalysis) अवलंबून आहे. कार्बन व्यतिरिक्त, यामध्ये फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सारख्या घटकांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पर्यायी रासायनिक संरचनेमुळे परकीय जीवांचा जन्म होऊ शकतो. शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून रसायनशास्त्राच्या आधारे परग्रहावरील जीवसृष्टी विकसित होऊ शकते का यावर संशोधन करत आहेत. प्रजनन प्रक्रियेद्वारे नाही तर रासायनिक प्रक्रियांमुळे एलियन्सची निर्मिती म्हणजे जन्म होत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एलियन हे पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या घटकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असलेल्या घटकांपासून बनलेले आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. हे वेगळे घटक एलियन्सला त्यांच्या ग्रहावर राहण्यास कशाप्रकारे सक्षम बनवतात आणि ते पृथ्वीवरील वातावरणात जिवंत राहू शकतात का यालर देखील संशोधन सुरु आहे.
मेक्सिकोच्या संसदेत दाखवण्यात आलेले मृतदेह एलियन्सचेच कथित मृतदेह असल्याचा दावा तिथल्या डॉक्टरांच्या पथकानं केलाय. गेल्या आठवड्यात मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सचे मृतदेह दाखवण्यात आले होते. हे मृतदेह 2017 मधये पेरूतल्या प्राचीन नाझका लाईन्सजवळ सापडले होते. यातील एक एलियन कधीकाळी जिवंत असल्याचा दावाही डॉक्टरांनी केलाय.