अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांना भारतातून माघारी बोलावले, कारण...

अमेरिकेने आपल्या नागरिकांना (America citizens) भारतातून माघारी बोलावले आहे. भारतात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus in India) दिसून येत असल्याने परत येण्याचे आवाहन अमेरिकेने आपल्या नागरिकांना केले आहे.

Updated: May 8, 2021, 07:57 AM IST
अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांना भारतातून माघारी बोलावले, कारण... title=
संग्रहित छाया

मुंबई : अमेरिकेने आपल्या नागरिकांना (America citizens) भारतातून माघारी बोलावले आहे. भारतात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus in India) दिसून येत असल्याने परत येण्याचे आवाहन अमेरिकेने आपल्या नागरिकांना केले आहे. कोविड -19च्या वाढत्या घटनांमुळे आणि मोठ्या प्रमाणात होणारी कोरोना विषाणूची वाढ लक्षात घेता अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतात प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सध्याच्या विमानामधून घरी परत जाण्याचे आवाहन शुक्रवारी केले. परराष्ट्र विभागाने हेल्थ अ‍ॅलर्ट जारी केला आहे की, युनायटेड एअरलाइन्स आणि एअर इंडिया सध्या भारतपासून अमेरिकेसाठी साप्ताहिक थेट उड्डाणे चालवित आहेत.

अनेक विमान कंपन्या प्रवासाची सुविधा देत आहेत

एरअ फ्रान्स, लुफ्थांसा आणि कतार एअरवेज येथे पॅरिस, फ्रांकफुर्त आणि डोहा उड्डाणे जाण्याची सुविधा आहे. हेल्थ अ‍ॅलर्टमध्ये असे म्हटले आहे की ज्या अमेरिकन नागरिकांना भारतातून माघारी यायचे आहे त्यांना एअरलाइन्समार्फत तिकीट बुक करण्याचे प्रोत्साहन दिले जाते.

कोरोना निगेटिव्ह टेस्ट आवश्यक  

त्यात असे म्हटले आहे की अमेरिकेत जाणाऱ्या प्रत्येकासाठी (दोन वर्षे किंवा त्याहून अधिक) कोविड -19 ची प्रवासाच्या तीन दिवस आधी तपासणी केली पाहिजे आणि विमानात चढण्यापूर्वी निगेटिव्ह टेस्ट अहवाल आवश्यक आहे. प्रवाशांनी कोविड -19मधून बरे असल्याचे कागदपत्र दाखवावे.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे घेतला निर्णय

हेल्थ अ‍ॅलर्ट जारी करताना म्हटले आहे की, अमेरिकेत पोहोचल्यानंतर प्रवाश्यांनी मार्गदर्शक सूचना पाळल्या पाहिजेत. अमेरिकेने या आठवड्यात भारताबद्दल एक ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी जारी केली आणि तेथील कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तेथील नागरिकांनी भारतात प्रवास न करण्याचे आवाहन केले.