डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टारशी संबंध, लपविण्यासाठी मोजलेत पैसे?

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने कोणत्या ना कोणत्यातरी प्रकरणाने चर्चेत असतात. आता नवे प्रकरण पुढे आले आहे. त्यांचे म्हणे एका पॉर्न स्टारशी संबंध होते. ते लपविण्यासाठी त्यांनी पैशाची ऑफर देऊन तोंड बंद केल्याची चर्चा मीडियात आहे. तसे वृत्तही प्रसिद्ध झालेय.

Updated: Jan 13, 2018, 08:47 PM IST
डोनाल्ड ट्रम्प यांचे  पॉर्न स्टारशी संबंध, लपविण्यासाठी मोजलेत पैसे? title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने कोणत्या ना कोणत्यातरी प्रकरणाने चर्चेत असतात. आता नवे प्रकरण पुढे आले आहे. त्यांचे म्हणे एका पॉर्न स्टारशी संबंध होते. ते लपविण्यासाठी त्यांनी पैशाची ऑफर देऊन तोंड बंद केल्याची चर्चा मीडियात आहे. तसे वृत्तही प्रसिद्ध झालेय.

पॉर्न स्टार सोबतचे संबध लपवण्यासाठी ट्रम्प यांनी हे पैसे दिले असल्याचं वृत्त ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेय. पॉर्न स्टारला जवळपास ८२ लाख रुपये दिल्याचं वृत्त समोर आले आहे. आपल्या खासगी वकिलाच्या माध्यमातून हे पैसे दिल्याचं उघड झाले आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे कारनामे आता उघड होत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रॅम्प यांचे लग्न २००५ मध्ये म्हणजे वर्षभरापूर्वीच झाले होते. त्यामुळे याबाबत गप्प राहण्यासाठी क्लिफोर्डला सुमारे ८२ लाख रुपये देण्यात आले होते. मात्र न्यूयॉर्क डेली न्यूजच्या वृत्तानुसार, क्लिफोर्डने एका मेलच्या माध्यमातून ट्रम्प यांच्यासोबत संबध नसल्याचे स्पष्ट आहे. 

तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि स्टेफनी क्लिफोर्ड यांची २००६ मध्ये भेट झाली होती. यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर येतेय. या वृत्तानंतर अमेरिकेत खळबळ उडाली आहे. मात्र व्हाईट हाऊसने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ट्रम्प यांचे खासगी वकील मायकल कोहेने यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावताना ते निरर्थक असल्याचे म्हटलेय.