अम्यूजमेंट पार्कमध्ये अचानक तुटला पाळणा, व्हिडीओ थरकाप उडवणारा

हा व्हिडीओ अम्यूजमेंट पार्कमधील आहे. येथे एका पाळण्याचा अपघात झाला आहे.

Updated: Aug 3, 2022, 09:19 PM IST
अम्यूजमेंट पार्कमध्ये अचानक तुटला पाळणा, व्हिडीओ थरकाप उडवणारा title=

मुंबई : सोशल मीडियावरील व्हिडीओ आपल्याला नेहमीच आश्चर्यचकीत करत असतात. तर येथील काही व्हिडीओ हे आपल्या हृदयाचा ठोका देखील चुकवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमचा थरकाप उडेल. हा व्हिडीओ अम्यूजमेंट पार्कमधील आहे. येथे एका पाळण्याचा अपघात झाला आहे.

हा व्हिडीओ चीनमधील अम्यूजमेंट पार्कमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. जेथे अचानक एक पाळणा तुटला आणि या अपघातात 18 लोक जखमी झाले आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच तो भलताच चर्चेत आला आहे. खरंतर आपली मुलं पाळण्यात बसण्याची मजा घेत असताना त्यांच्या पालकांनी व्हिडीओ काढते. त्या दरम्यान हा अपघात घडला, ज्यामुळे ही घटना कॅमेरात कैद झाली.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाळणा फिरत आहे आणि लहान मोठे सगळेच लोक त्या पाळण्यात बसले आहे. तेव्हा पुढच्याच क्षणी तो पाळता तुटतो ज्यामुळे सगळे लोक खाली पडतात. या घटनेत 18 लोक जखमी झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे.

याआधीही अम्यूजमेंट पार्कमध्ये अशा घटना ऐकायला मिळाल्या आहेत. काही काळापूर्वी यूकेमध्ये एक राइड हवेत अडकली. यामुळे सर्व लोक तासन्तास मध्येच लटकले होते. त्यात आता चीनच्या या व्हिडीओने भर टाकली आहे.