बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डच्या आईशी ओळख करायला जेव्हा घरी आला...

गर्लफ्रेंडच्या घरी तरूणाची भेट

Updated: Dec 6, 2021, 10:12 AM IST
बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डच्या आईशी ओळख करायला जेव्हा घरी आला...

मुंबई : आपल्या जोडीदाराने पालकांना भेटावं, त्यांची मर्जी राखावी अशी असं प्रत्येकालाच वाटतं. पण हे वाटणं जेव्हा तुम्हाला चांगलच महागात पडतं तेव्हा.... असंच काहीस एका मुलीला चांगलच भारी पडलं आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 

गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन पालकांना भेटण्यासाठी जाते. आणि हाच प्रकार गर्लफ्रेंड, बॉयफ्रेड आणि गर्लफ्रेंडच्या आईला चांगलच महागात पडलं आहे. तिघांना ही भेट चांगलीच लक्षात राहणार आहे. 

द सन वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन घरी पालकांना भेटायला घेऊन आली. तेव्हा बॉयफ्रेंडला मुलीच्या आईला बघून चांगलाच धक्का बसला. ही धक्कादाक बाब सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली.

प्रियसीच्या घरी जाणं पडलं महागात 

बॉयफ्रेंडने सांगितले की, त्याच्या मैत्रिणीला अनेक दिवसांपासून त्याला तिच्या घरी घेऊन जायचे होते. त्याची गर्लफ्रेंड त्याला तिच्या पालकांशी ओळख करून देण्यासाठी खूप उत्सुक होती. ती त्याला रोज तिच्या घरी यायला सांगायची. यानंतर एके दिवशी बॉयफ्रेंड आपल्या मैत्रिणीच्या घरी जायला तयार झाला. पुढे बॉयफ्रेंडने सांगितले की, तो नुकताच त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेला आणि तिच्या पालकांना भेटला. पण त्याच्या आईला पाहून तो थक्क झाला.

बॉ.फ्रेंडने सांगितले की, त्याचे दोन वर्षांपूर्वी तिच्या आईसोबत अफेअर होते. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, तो 19 वर्षांचा असताना वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून काम करत असे. त्यादरम्यान त्याच्या मैत्रिणीची आई जिममध्ये यायची. इथे दोघींची भेट झाली आणि दोघे फिजिकल रिलेशनमध्ये आले. त्या व्यक्तीने सांगितले की, दोघांचे नाते खूप गोड होते.

युवकाला या कारणामुळे पश्चाताप 

बॉयफ्रेंडने सांगितले की, त्याच्या मैत्रिणीची आई तेव्हा 40 वर्षांची होती पण ती 25 वर्षांच्या मुलीसारखी दिसत होती. त्यामुळेच तो तिच्याकडे आकर्षित झाला होता. तरूणाने सांगितले की, प्रेयसीची आई त्याची एक्स प्रेयसी होती. याचे त्याला दु:ख नाही. उलट सध्या ती आपल्या मैत्रिणीची आई झाल्याची खंत त्याला आहे.

तरुणाने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तो त्याच्या सध्याच्या मैत्रिणीलाही ओळखत नव्हता. तरूणाने सांगितले की आपण आपल्या प्रेयसीशी बेवफाई केली नाही, परंतु प्रेयसीच्या आईला भेटल्याचा पश्चाताप होत आहे. त्याने सांगितले की तो त्याच्या मैत्रिणीलाही हे सांगू शकत नाही. त्यादरम्यान महिलेने स्वतः हे नाते तोडले होते आणि दोघांमधील वयाचे अंतर खूप असल्याचे सांगितले होते.