Bre Thompson : प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा पगार किती असतो? फार फार तर काही हजार रुपयांपर्यंत. मात्र, प्राथमिक शाळेत शिकवणारी एक महिला शिक्षिका महिन्याला तब्बल 10 कोटींची कमाई करत आहे. शाळेत शिक्षिकेची नोकरी करण्यासह ही महिला 11 प्रकारच्या मार्गांनी पैसा कमावते. युकेमधील ही महिला टीचर सध्या चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहे.
ब्रे थॉम्पटन (Bre Thompon) असे या महिला टीचरचे नाव आहे. ब्रे थॉम्पटन ही युकेमधील एका खाजगी शाळेत प्राथमिक वर्गाला शिकवणारी शिक्षिका आहे. मात्र, शिक्षिकेच्या नोकरीसह ब्रे थॉम्पटने कमाईसाठी अनेक पर्याय शोधले आहेत. या माध्यमातून ती महिन्याला तब्बल 10 कोटींची कमाई करत आहे.
शिक्षिकेच्या नोकरीसह ब्रे थॉम्पटन आणखी विविध प्रकारच्या माध्यमातून पैसे कमावत असल्याचे शाळा व्यवस्थापनला समजले. त्यांनी तिच्या या पार्ट टाईम कानावर आक्षेप घेत तिला नोकरीवरुन काढून टाकले. मात्र, नोकरी गेल्यावर ब्रे थॉम्पटनचे हे साईड इन्कम आणखी वाढले. कारण, तिला पूर्ण वेळ तिच्या कामावर फोकस करता आले.
महिन्याला 10 कोटींची कमाई करणारी ब्रे थॉम्पटन नेमकं करते तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. या प्रश्नाचे उत्तर ब्रे थॉम्पटनच तिच्या व्हिडिओमधून देते. ब्रे थॉम्पटन ही सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आहे. सोशल मिडियावर तिचे लाखो हजारो फॉलअर्स आहेत. ब्रे थॉम्पटन चा एक युट्युब चॅनेल देखील आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती लहान मुलांची काळजी कशी घ्यावी याबबात टिप्स देत असते. तसेच दुसऱ्या एका युट्युब चॅनेलच्या माध्यमातून ती मुलांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील टीप्स देत असते. याशिवाय ब्रे थॉम्पटन इंटरनेशनल टीचर्सची एक साईट जॉईन केली आहे. ती यांच्यामाध्यमातून शालेय साहित्य विकते. विशेष म्हणजे ती आपल्या युट्युब चॅनेल्सवर या वस्तुंची जाहिरात करते. प्रमोशन आणि युट्युब चॅनेलच्या माध्यमातून ती लाखोंची कमाई करते. या शिवाय ब्रे थॉम्पटन हिने शेअर मार्केटमध्ये देखील पैसे गुंतवले आहे. अशा प्रकारे विविध 11 प्रकारे महिन्याला 10 कोटींची कमाई करत आहे. ब्रे थॉम्पटनने युट्युब चॅनेलच्या मुलाखतीत आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत जाहीर केले होते.