Venus and Jupiter Meet in sky : लहान मुलांसाठी चंद्र चंदा मामा आहे. कवींसाठी तो एक विशेषण आहे. तर, प्रेवमीरांसाठी तो प्रेमाचा साक्षीदार आहे. या झाल्या चंद्राबाबतच्या काल्पनिक प्रतिमा. पण, खगोल अभ्यासकांसाठी चंद्र (Moon) हे ज्ञानाचे भंडार आहे. याच चंद्राच्या साक्षीनेच आकाशात एक महत्वपूर्ण खगोलीय घटना घडली आहे. अवकाशात दोन ग्रहांच्या भेटीचा दुर्मीळ योग घडून आला. शुक्र आणि गुरु हे ग्रह एकमेकांच्या अत्यंत जवळ आले (Venus and Jupiter Meet). खगोल अभ्यासक आणि खगोलप्रेमीसाठी ही खगोलीय घटना मोठी पर्वणी ठरली.
गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तर, चमकणारा तारा अशी शुक्र ग्रहाची ओळख. 22 फेब्रुवारी रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आले. विशेष म्हणजे या दोन्ही ग्रहांच्या मध्ये चंद्र आला होता. नुकतीच अमावस्या होवून गेली आहे. यामुळे या दोन ग्रहांच्या मध्ये चंद्रकोर पहायला मिळाली.
दोन ग्रहांच्या मध्ये चंद्रकोर असे विलोभनीय आणि सुंदर दृष्य अवकाशात पहायला मिळाले. खगोलीयदृष्ट्या ही अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. सूर्यास्तानंतर सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान शुक्र आणि गुरु हे ग्रह हळूहळू एकमेकांच्या जवळ आले.
शुक्र ग्रह पृथ्वीपासून सुमारे 210 दशलक्ष किमी अंतरावर उणे 3.9 तीव्रतेने चमकला.पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 66 हजार किमी अंतरावर असताना हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही ग्रह 29 अंशांनी वेगळे झाले होते आणि आता ते हळूहळू एकमेकांच्या जवळ येत आहेत. 20 फेब्रुवारीपर्यंत दोन ग्रहांमधील अंतर नऊ अंशांपेक्षा थोडे अधिक होते. 27 फेब्रुवारी रोजी हे अंतर केवळ 2.3 अंशांपर्यंत कमी होईल. 1 मार्च बुधवारी संध्याकाळी ग्रह सर्वात जवळ असतील, फक्त 0.52 अंश अंतरावर. गुरू ग्रह -2.1 तेजस्वितेने (Magnitude) चमकेल आणि शुक्र -4.0 तेजस्वितेने (Magnitude) चमकेल. चंद्र कोरीची प्रत 9.7 इतकी आहे.