बीजिंग : भारताला गुंतवणुकीचा प्रस्ताव व्हिएतनामने दिलाय. त्यामुळे भारत गुंतवणुकीचा विचार करत असताना आता चीनने या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीन-भारत द्विपक्षीय संबंध बिघडू नये, असे चीनच्या प्रवक्त्यांने म्हटलेय.
व्हिएतनाममार्फत वादग्रस्त दक्षिण चीन सागरात तेल आणि नैसर्गिक गॅस क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारताला खास निमंत्रण दिलेय. यावर चीन भडकला आहे. गुरुवारी चीने आपली नाराजी व्यक्त करताना म्हटलेय, द्विपक्षीय संबंध वाढविण्याच्यानिमित्ताने याचा विरोध केला जाईल. भारतातील व्हिएतनामचे राजदूत तोन सिन्ह थान्ह यांनी मंगळवारी एका न्यूज चॅनेलला सांगितले की, आमचा देश दक्षिण चीन सागरात भारताने गुंतवणूक करण्याबाबत स्वागत करील.
परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता लु कांग यांनी यावर प्रतिक्रिया दिलेय. चीन शेजारी राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांवर कोणतीही अडचण नाही. मात्र, याचा वापर चीनच्या वैधानिक अधिकांवर होत असेल तर चुकीचे आहे. दक्षिण चीन सागरात शांती आणि स्थैर्य अबाधित राहिले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे चीन याला तीव्र विरोध करेल.
चीनने भारत हा औएजीसीतर्फे दक्षिण चीन सागरात व्हिएतनामच्या दाव्यानुसार तेल साठ्यांचा शोध घेण्यास विरोध केलाय. मात्र, भारताने वादग्रस्त भागात कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे चीनचा विरोध होणे चुकीचे आहे, असे भारताने म्हटलेय.