VIDEO: असं होतं जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन

नाताळ अर्थात ख्रिसमसचं सेलिब्रेशन जगभरात विविध पद्धतीने केलं जातं. ख्रिसमस हा ख्रिश्चन समाजातील लोकांचा सर्वांत मोठा सण आहे. जगभरातील विविध देशांमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 22, 2017, 06:12 PM IST
VIDEO: असं होतं जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन title=

नवी दिल्ली : नाताळ अर्थात ख्रिसमसचं सेलिब्रेशन जगभरात विविध पद्धतीने केलं जातं. ख्रिसमस हा ख्रिश्चन समाजातील लोकांचा सर्वांत मोठा सण आहे. जगभरातील विविध देशांमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

(व्हिडिओज पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

डिसेंबर महीना सुरु होताच संपूर्ण जगभरात ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यासाठी तयारी आणि प्लॅनिंग होण्यास सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला असेच काही व्हिडिओज दाखविणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की ख्रिसमस कशा प्रकारे जगभरात साजरा केला जातो.

जगभरातील बहूतांश देशांमध्ये ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं. मात्र, प्रत्येक ठिकाणी सेलिब्रेशन करण्याची पद्धत ही काहीशी निराळी असते. चला तर मग, पाहूयात कुठल्या देशात आणि कशा प्रकारे ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं.

पॅरिसमधील ख्रिसमस सेलिब्रेशन

२५ डिसेंबर रोजी प्रभू येशूचा जन्म झाल्याचं मानलं जातं. तेव्हापासून नववर्षाच्या स्वागतापर्यंत ख्रिसमस हा सण साजरा केला जातो.

न्यूयॉर्कमध्ये अशा प्रकारे होतं सेलिब्रेशन

येशूजन्माच्या सोहळ्याला चर्चमध्ये मोठ्या संख्येने ख्रिस्ती धर्मियांसह सर्वधर्मीय नागरिक हजेरी लावतात.

रोममध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

ख्रिसमस म्हटलं की, सांताक्लॉजही आलाच. सांताक्लॉज हा बच्चे कंपनीसाठी एक आकर्षणाचा विषय असतो. अनेक ठिकाणी सांताक्लॉजची वेशभुषा करुन लहान मुलांना गिफ्ट, चॉकलेट्स वाटप केले जातात.

ब्रिटनमधील नागरिकांचं ख्रिसमस सेलिब्रेशन

जर्मनीत पारंपारिक पद्धतीने ख्रिसमसचं सेलिब्रेशन