Corona In chine : कोरोनाने (Corona cases) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कारण चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे (Corona Cases in China) वाढत आहेत. त्यामुळे चीनमध्ये प्रशासनाला निर्बंध लागू करावे लागले आहेत. पण याविरोधात आता लोकं रस्त्यावर उतरली आहेत. त्यांनी लॉकडाऊन (Lockdown) विरोधात घोषणाबाजी करत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चीनमध्ये 25 नोव्हेंबर रोजी एका इमारतीला आग लागली होती. पण कोरोना निर्बंधामुळे अग्निशमनदलाला वेळेत पोहोचता न आल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकं चांगलीच संतापली आहेत.
चीनमध्ये लोकं आता हुकुमशाही नको लोकशाही हवी अशा घोषणा करत आहेत. या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकं जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावं अशी मागणी जोर धरु लागली आहे.
विद्यार्थी देखील सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहेत. 'नो टू लॉकडाउन, येस टू फ्रीडम' अशा घोषणा दिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावले जात असल्याने कामगार देखील नाराज आहेत.
कोरोना निर्बंधांवरून झेंगझोऊ येथील आयफोन निर्माता फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी प्लांटमध्ये काम करणारे शेकडो कामगार सुरक्षा कर्मचार्यांना भिडले. कारण एका महिन्यापासून प्लांटमध्ये कडक निर्बंध लागू केले गेले आहेत.
27 नोव्हेंबरला चीनमध्ये कोरोनाचे 40,000 रुग्ण आढळले आहेत. 24 नोव्हेंबर रोजी ही संख्या 31,454 होती. 26 ऑक्टोबर रोजी 35,183 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. चीनमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांच्या वर गेली आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे लोकांना महागाईचा देखील सामना करावा लागत आहे.