Coronavirus : बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या 'कोरोना' लढ्याचं कौतुक

आरोग्य सेतू ऍपचं देखील कौतुक 

Updated: Apr 23, 2020, 11:23 AM IST
Coronavirus : बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या 'कोरोना' लढ्याचं कौतुक  title=

मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. संपूर्ण जगाला कोरोनाने वेढीस धरलं आहे. असं असताना भारत देश देखील कोरोनाशी लढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. भारताने २४ मार्चपासूनच भारतात लॉकडाऊन घोषित केला आहे. आता लॉकडाऊनचा दुसरा पिरिएड असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन चालणार आहे. 

'मायक्रोसॉफ्टचे' संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केलं आहे.  कोरोनासोबतच्या लढ्यात केलेल्या उपाययोजनांमुळे बिल गेट्सकडून मोदींच कौतुक करण्यात आल आहे. 

गेट्स यांनी मोदींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच 'आरोग्य सेतू' ऍपचं देखील कौतुक केलं आहे. मोदींनी वेळेत केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या संसर्गात दरात घट झाली आहे.  

बिल गेट्स यांनी पत्र लिहून मोदींचं कौतुक केलं आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण वाढत असला तरीही त्यावरील उपाययोजन कौतुकास्पद आहे. या जागतिक साथीच्या रोगाविरूद्ध लढण्यासाठी हेल्थ इंफ्रास्ट्रक्टचरवर फोकस करण्यात आलं आहे. हे कौतुकास्पद असल्याचे म्हणाले. 

मला आनंद आहे की, सरकारने 'कोविड-१९' शी लढण्यासाठी असामान्य डिजिटलं क्षमतांच पूर्णपणे वापर केला आहे. कोरोना व्हायरस ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि जनतेला आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी आरोग्य सेतू डिजिटल ऍप लाँच करण्यात आलं आहे.