कोरोना लसीच्या संशोधनाबाबत तज्ज्ञांकडून मोठा इशारा

असं केल्यास... 

Updated: May 13, 2020, 07:03 PM IST
कोरोना लसीच्या संशोधनाबाबत तज्ज्ञांकडून मोठा इशारा  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : अमेरिकेतील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ एँथनी फाऊची यांनी मंगळवारी एक अतिशय महत्त्वाचा इशारा दिला. Coronavirus कोरोना व्हायरसविरोधातील लसीचं संशोधन सुरु आहे. पण, यासाठी काही वेळ दवडला जाऊ शकतो. कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, सोशल डिस्टन्सिंग आणि सार्वजनिक आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रीत केलं जाणं अतिशय महत्त्वाचं असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 

सध्याच्या घडीला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्गाचा वेग पाहता सामाजिक जीवन आणि उद्योगधंद्यांवर लावण्यात आलेले प्रतिबंध फार लवकरच शिथिल केल्याच यामुळे अनेक अडचणी उभ्या राहतील. शिवाय मृत्यूदरही वाढेल. याचा मोठा परिणाम हा आर्थिक विकासदर थांबण्याच्या रुपातही दिसू शकतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार लहानशी चूकही कोरोनाच्या या दहशतीच्या वातावरणारत होत्याचं नव्हतं करण्यास जबाबदार शरु शकते. 

अमेरिकेत कोरोनाने जनजीवन, अर्थव्यवस्था आणि इतरही बऱ्याच मुद्द्यांवर परिणाम करत काही मोठ्या अडचणी उभ्या केल्या आहेत. या विषाणूला आळा घालण्यासाठी म्हणून अमेरिकेत अतिशय वेगाने कोरोनाच्या चाचण्याही केल्या जात आहेत, पण सद्यस्थिती पाहता हे सारं पुरेसं नाही सीनेट समितीच्या रिपब्लिकन अध्यक्षपदी असणाऱ्या लामर अलेक्झँडर यांनी दिली. 

TDS पासून EPF पर्यंत, वाचा अर्थमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा

 

अमेरिकेची एकंदर परिस्थिती पाहता कोरोना विषाममुळे येथील जनजीवनासोबतच अर्थव्यवस्थेला मोठ बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही भागामध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याचा विचार प्रकर्षाने पुढे येत आहे. पण, असं केल्याच परिस्थिती आणखी चिघळण्याचा इशारा देण्यात येत आहे. तेव्हा आता कोरोनाशी लढा देत लॉकडाऊनच्या बाबतीत अमेरिकेत कोणते निर्णय़ घेतले जातात याकडे साऱ्या जगाचं लक्ष असेल.