नवी दिल्ली : चीनच्या धमकीला बगल देत अमेरिकेच्या सभापती नॅन्सी पेलोसी मंगळवारी तैवानमध्ये पोहोचल्या. नॅन्सी या तैवानला पोहोचल्यानंतर तासाभरापेक्षा कमी कालावधीत चीनने तैवानला धमकी दिली. चीनने तैवानला टार्गेट हल्ल्याची धमकी दिली आहे. तैवानला लष्करी हल्ल्याची उघड धमकी देण्याबरोबरच चीनने अमेरिकेला सांगितले आहे की ते आगीशी खेळत आहेत.
चीनच्या 21 लढाऊ विमानांनी तैवान सीमेजवळ उड्डाण घेतल्याचे वृत्त आहे. चिनी सैन्याची ईस्टर्न थिएटर कमांड तैवानमध्ये लष्करी कारवाई करेल. नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये आल्यानंतर चीनचे संरक्षण मंत्रालय हाय अलर्टवर आहे. याशिवाय 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान तैवानभोवती युद्ध सराव करणार असल्याची धमकी चीनने दिली आहे.
याची जबाबदारी अमेरिकेला घ्यावी लागेल, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या या भेटीमुळे चीनच्या सार्वभौमत्वाला धक्का बसला आहे.
चीनच्या सरकारी मीडियाने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने मंगळवारी सांगितले की, तैवानमध्ये लक्ष्यित हल्ले केले जातील. चिनी आर्मी (PLA) तैवानमध्ये लक्ष्यित हल्ले करणार असल्याचे सांगण्यात आले. नॅन्सी पेलोसी तैवानला पोहोचल्यानंतर तासाभरातच चीनकडून धमकी आली. मात्र, चीनकडून मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तैवानचे म्हणणे आहे.
चीन 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान तैवानच्या 6 बाजूंनी लष्करी चाचण्या घेणार असल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे बुधवार, 3 ऑगस्ट रोजी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेऊन नॅन्सी पेलोसी परतणार आहेत. दरम्यान, अमेरिका हा जागतिक शांततेला धोका असल्याचे वक्तव्य चीननेही अमेरिकेबाबत केले आहे.
नॅन्सी पेलोसी सारख्या उच्चस्तरीय अमेरिकन प्रतिनिधीने तैवान दौऱ्याची गेल्या 25 वर्षात ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, तेथे सायबर हल्ले होत असल्याचा तैवानचा आरोप आहे.