Okay शब्द कुठून आला, माहित आहे का?

1830 च्या दशकाच्या अखेरीस या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात झाली. 

Updated: Mar 23, 2022, 03:34 PM IST
Okay शब्द कुठून आला, माहित आहे का? title=

मुंबई : दररोजच्या जीवनात असे अनेक शब्द आहेत जे आपण सर्रास वापरतो. पण, त्या शब्दाचा जन्म नक्की कसा झाला याबाबत आपल्याला जास्त माहिती नसते. असे अनेक वाक्य आणि शब्द आहेत जे आपण इतरांसोबत बोलताना वापरतो. त्यातीलच एक शब्द म्हणजे ओ... के... प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना किंवा कोणाला होकार द्यायचा असले... एवढंच नाही, तर प्रतिसाद देण्यासाठी ही आपण ओके असं म्हणतो. 

आत्ताच्या सोशल मीडियाच्या जमान्यात या शब्दाचा मोठ्या प्रमाणात वापर होतोयं. OK चा याचा इतिहास  जवळपास हा फार जुना आहे. 1830 च्या दशकाच्या अखेरीस या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात झाली. 

त्यावेळी एखादा शब्द पूर्ण बोलण्याऐवजी शॉर्ट फॉर्ममध्ये बोलण्याचा ट्रेंड होता. अशातच एक चुकीचा उच्चार झाला आणि OK शब्दाचा शोध लागला. 'ओ... के...' या शब्दाचा शोध लागला. 

त्याच्या अनेक कथा आतापर्यंत समोर आल्या आहेत. ओके हा शब्द पहिल्यांदा " 23 मार्च 1839 मध्ये 'बोस्टन मॉर्निंग पोस्ट' वृत्तपत्रात हा शब्द पहिल्यांदा प्रिंट झाला. त्या वृत्तपत्रातील एक लेखक चार्ल्स गार्डन ग्रीन यांनी आपल्या लेखात OK या शब्दाचा वापर सर्वप्रथम केला होता.

अमेरिकेतील बोस्टन शहरात म्युनिसिपल कॉर्पोरेशनने लागू केलेल्या एका कायद्याविरोधात Anti-Bell-Ringing-Society शी संबंधित हा शब्द आहे. काहींच्या मते स्कॉटिश शब्द och aye (meaning- “oh yes”) किंवा ग्रीक शब्द ‘ola kala’ (meaning- “All Good”) या शब्दांचा अपभ्रंश होऊन ok शब्दाची निर्मिती झाल्याचे बोललं जातं.

सर्वमान्य भाषातज्ज्ञांच्या मते Anti-Bell-Ringing-Society हीच या शब्दाची जननी आहे, असे मानण्यात येते.OK याचा अर्थ सर्व चांगलं असा होतो. 

तर रोजच्या वापरातील ओके शब्दाचे काही फुल फॉर्म आहेत. ते असे : OK – All Correct OK – All Clear OK – Okay OK – Objection Killed OK – Objection Knocked OK – Oll Korrect