मुंबई : भारत, अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचं संक्रमण झपाट्याने वाढत आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा १४ लाखाच्या वर गेला आहे. सर्वाधिक रूग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेत दीड लाखाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. सर्वाधिक बातमी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायनला कोरोनाचा व्हायरस यांना संक्रमण झालं आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनाला खूप मोठा फटका बसला आहे.
डोनाल्ड ट्रम्पचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. यामुळे ट्रम्प सरकारला मोठा फटका बसला आहे. व्हाइट हाऊसने याबाबत माहिती दिली आहे की, ओ ब्रायन यांना कोरोनाची हलकी लक्षण आहेत. ते स्वतः आता आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा आकडा वाढत असताना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हॅक्सीन संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हॅक्सीनबाबत मी एवढंच सांगेन की, पुढच्या दोन आठवड्यात आपल्या कानावर चांगली बातमी पडणार आहे. आम्ही लवकरच या संबंधात महत्वाची घोषणा करणार आहोत.
या अगोदर नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ (NIH) ने एका पत्रकार परिषदेत सांगितलं की,'अमेरिकेच्या संशोधकांनी मॉडर्ना कंपनीद्वारे विकसित केलेल्या Covid-19 व्हॅक्सीनच्या तिसऱ्या ट्रायलला सुरूवात केली आहे.'