उत्तर कोरिया विरूद्ध अमेरिका, जपान एकत्र

अमेरिकेने जपानच्या साक्षीने उत्तर कोरियाला सज्जड शब्दात इशारा दिला आहे की, आता सुधारा अन्यथा राजकीय चर्चेने मार्ग काढण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 6, 2017, 06:18 PM IST
उत्तर कोरिया विरूद्ध अमेरिका, जपान एकत्र title=

टोकियो : अमेरिकेने जपानच्या साक्षीने उत्तर कोरियाला सज्जड शब्दात इशारा दिला आहे की, आता सुधारा अन्यथा राजकीय चर्चेने मार्ग काढण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.

उत्तर कोरियाच्या सततच्या अण्वस्त्र सज्जतेच्या धमकीला कंटाळून यावर मार्ग काढण्यासाठी अमेरिका जोरदार हालचाल करत आहे. दरम्यान, अमेरिकेला उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर जपाननेही समर्थन दिले आहे. या समर्थनानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. आपल्या इशाऱ्यात ट्रम्प यांनी म्हटले आहे की, उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम हा आंतरराष्ट्रीय सभ्यता आणि शांततेच्या स्थिरतेला धक्का लावणारा आहे. त्यामुळे त्यावर वेळीच उपाययोजना करायला हवी. अशियायी दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. ट्रम्प यांच्य इशाऱ्यानंतर जग पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यवर येऊन ठेपले आहे की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी यापूर्वही उत्तर कोरियाला अनेकदा इशारे दिले आहेत. मात्र, हे इशारे उत्तर कोरियाने वेळोवेळी उडवून लावले आहेत. दरम्यान, या वेळी मात्र ट्रम्प यांनी उत्तर कोरियास दिलेला इशारा हा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत केले आहे. दरम्यान, शिंजो आबे यांनीही ट्रम्प यांच्या विधानाला पाठींबा दिला आहे. उत्तर कोरियामुळे निर्माण झालेल्या धोक्यापासून सुरक्षेचा मार्ग काढण्याच्या सर्व प्रयत्नांना जपानचा पाठिंबा असल्याचे आबे यांनी म्हटले आहे.

विशेष असे की, अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष यांनीही उत्तर कोरियाशी संबंध तोडले होते. उत्तर कोरिया हा जोपर्यंत आपल्या अण्वस्त्रखोरीला आळा घालत नाही. तोपर्यंत अमेरिका उत्तर कोरियाशी संबंध ठेऊ इच्छित नाही, असे स्पष्ट शब्दांत म्हटले होते.