वॉशिंग्टन : Musk cancels Twitter deal: Twitter खरेदीचा करार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे Twitter आता एलन मस्क (Elon Musk) यांच्याविरोधात खटला दाखल केला जाणार आहे, अशी घोषणा ट्विटरने केली आहे. दरम्यान, ट्विटरने बनावट खात्यांची माहिती न दिल्याने हा करार रद्द करत असल्याची घोषणा एलन मस्क यांनी केली. तब्बल 44 अब्ज डॉलरचा करार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे Twitter मोठा धक्का बसला आहे.
टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी शुक्रवारी ट्विटर खरेदी करार रद्द केला. यामुळे उद्योगक्षेत्रात मोठी चर्चा सुरु झाली आहे. ट्विटरच्या बोर्डाच्यावतीने (Twitter) बनावट खात्यांची खरी संख्या लपवून चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याने हा निर्णय घेतल्याचे मस्कचे म्हणणे आहे. इलॉन मस्क यांच्यावतीने यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला (SEC) ला सांगण्यात की, कराराच्या वेळी ट्विटरने करारामध्ये चुकीची माहिती दिली होती, ज्यामुळे 44 अब्ज डॉलरचा ट्विटर करार संपुष्टात येत आहे.
एसईसीमध्ये, एलन मस्क यांनी सांगितले की, ट्विटरवरील बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या, ही खाती कॅप्चर करण्याच्या पद्धती आणि कारवाई करण्याच्या पद्धतींबद्दल माहिती हा करार होण्यासाठी महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत. या संदर्भात इलन मस्क आणि त्यांची टीम गेल्या 2 महिन्यांपासून सतत ट्विटरवर संपर्क साधून माहिती घेत होती. पण प्रत्येकवेळी ट्विटरचे बोर्ड एकतर माहिती देण्यास टाळाटाळ करत होते किंवा अर्धी अपूर्ण माहिती देत होते.
ट्विटरची ही वृत्ती पाहून टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरसोबतचा 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार पूर्णपणे रद्द केला. एलन मस्कच्या टीमने 5 वेळा माहिती मागवली. यूएस सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनला (एसईसी) एलन मस्क यांनी सांगितले की ट्विटरने 9 मे, 25 मे, मे, 6 जून, 17 जून आणि 29 जून रोजी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बनावट आणि स्पॅम खात्यांबाबत 5 वेळा लिहिले आहे. त्याला त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. ट्विटर बोर्ड मस्कच्या टीमशी खोटे बोलले?
एलन मस्क यांच्यावतीने सांगण्यात आले की, कराराच्या वेळी ट्विटरने एसईसीला सांगितले होते की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 5 टक्के बनावट आणि स्पॅम खाती आहेत. जरी मस्कच्या टीमचा असा विश्वास आहे की ट्विटर खोटे बोलले आणि बनावट खात्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे. एलन मस्कच्या टीमच्या म्हणण्यानुसार, ट्विटर बरीच माहिती लपवत आहे. कारण ट्विटरच्या कमाईपैकी 90 टक्के जाहिरातींमधून येते.
ट्विटर आणि मस्क यांच्यातील खरेदी करारानुसार, करार रद्द झाल्यास, मस्क यांना अटींनुसार 1 अरब डॉलर करारापोटी शुल्क द्यावे लागेल. पण मस्क फक्त ब्रेक-अप फी भरुन सुटू शकत नाहीत. करारात अशी तरतूद समाविष्ट आहे जी मस्क यांना करार पूर्ण करण्यास भाग पाडू शकते. याचा अर्थ मस्क आणि ट्विटरमध्ये आता प्रदीर्घ कायदेशीर लढाई होऊ शकते.