Fact Check : एलियन्स पृथ्वीवर येण्याच्या तयारीत?

एलियन्स पृथ्वीवर येणार असल्याचे दावे केल्यानं शास्त्रज्ञ संशोधन करतायत.

Updated: Oct 11, 2022, 11:46 PM IST
Fact Check : एलियन्स पृथ्वीवर येण्याच्या तयारीत? title=

Viral Polkhol : एलियन्स पृथ्वीवर (aliens) येणार आहेत असा दावा करण्यात आलाय. होय, यावर सध्या संशोधन सुरू आहे. पण, हे एलियन्स पृथ्वीवर आले तर ते मानवासाठी धोक्याचे ठरू शकतात. या दाव्यात किती तथ्य आहे. याची आम्ही पडताळणी केली.मग काय सत्य समोर आलं.चला पाहुयात. (fact check viral polkhol aliens preparing to land on earth know what truth what false)

एलियन्स जगासाठी धोक्याचे आहेत असा दावा करण्यात आलाय. स्पेस पॉलिसीमध्ये असा दावा करण्यात आलाय की एलियन्स मानवासाठी धोक्याचे ठरू शकतात. एलियन्स पृथ्वीवर येणार असल्याचे दावे केल्यानं शास्त्रज्ञ संशोधन करतायत. पण, एलियन्सशी संपर्क साधणं, ते पृथ्वीवर येणं म्हणजे विनाशकारक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.असे अनेक दावे केल्यानं लोकांच्या मनात भीती निर्माण होतेय. खरंच एलियन्स आहेत का? हाच मुळात प्रश्न पडतो..चित्रपटाशिवाय इतर कुठेही एलियन्स अजून पाहिलेले नाहीत. मग अचानक हे एलियन्स येतायत कुठून? असे अनेक प्रश्न पडल्याने आम्ही याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी काय पोलखोल झाली पाहुयात.

व्हायरल पोलखोल

एलियनबाबत शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे. एलियनच्या अस्तित्वाबाबत अद्याप कोणतेही पुरावे नाहीत. अनेक वेळा एलियन्सबाबत चर्चा ऐकण्यात येतात. एलियन्स खरंच पृथ्वीवर उतरणार का हे पाहावं लागेल. एलियन्सच्या अस्तित्वाबाबत कुठेही पुरावे नाहीत. त्यावर संशोधन सुरू आहे. असं जरी असलं तरी आताच एलियन्स मानवांसाठी खतरनाक आहेत हे सांगता येणार नाही. त्यामुळे अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नका.