मृत्यू आणि त्याच्यात फक्त एक सेकंदाचा वेळ, लिफ्टमधला हा Video पाहून उडेल थरकाप

लिफ्टने जाताना काळजी घ्या... सोशल मीडियावर होतोय Video व्हायरल

Updated: Oct 11, 2022, 10:10 PM IST
मृत्यू आणि त्याच्यात फक्त एक सेकंदाचा वेळ, लिफ्टमधला हा Video पाहून उडेल थरकाप title=

Trending Video : लिफ्ट अपघाताच्या (Lift Accident) अनेक बातम्या आपण ऐकत असतो, वाचत असतो. अनेक घटनांमध्ये मृत्यू झाल्याच्या तर काही वेळा अगदी थोडक्यात जीव वाचल्याच्या घटना घडत असतात. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ (Video) पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. मोबाईलवर बोलता बोलता तरुण लिफ्ट बाहेर पडत असताना अचानक लिफ्ट सुरु होते. पण तो तरुण वेळीच सावध होतो आणि थोडक्यात त्याचा जीव वाचतो.

काय आहे त्या व्हिडिओत?
रशियातली ही घटना आहे. एका इमारतीच्या लिफ्टमधल्या सीसीटीव्हीचा (CCTV) हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत आपल्याला दिसतंय, लिफ्ट इमारतीच्या एका फ्लोरवर येते आणि लिफ्टचा दरवाजा उघडतो. एक व्यक्ती लिफ्टच्या आत प्रवेश करते, तर एक व्यक्ती लिफ्टमधून बाहेर पडत असते. पण बाहेर पडणारा तरुण लिफ्टबाहेर जाणार तोच लिफ्ट सुरु होते आणि अचानक दरवाजे बंद होतात. त्या तरुणाची मान कापली जाणार असं वाटत असतानाच अवघ्या काही क्षणात तो स्वत:ला सावरतो आणि मागे होतो. 

व्हायरल व्हिडिओने लोकं हैराण
सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी म्हटलंय, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडाला. तर काही जणांनी म्हटलंय तो तरुण खरंच नशिबवान आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फूटेज रशियातल्या क्रास्नोडार शहरातल्या एका इमारतीतला आहे. 

हा व्हिडिओ एका यूजरने YouTube वर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.