Fact Check | जिवंत मासा पाण्याबाहेर काढताच होतो गायब?

एका रहस्यमय माशाची बातमी आहे. एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत एक असा मासा आहे तो पाण्याबाहेर काढताच गायब होतो.

Updated: May 20, 2022, 10:11 PM IST
 Fact Check | जिवंत मासा पाण्याबाहेर काढताच होतो गायब? title=

मुंबई : एका रहस्यमय माशाची बातमी आहे. एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत एक असा मासा आहे तो पाण्याबाहेर काढताच गायब होतो. हा दावा ऐकून आम्हालाही आश्चर्य वाटलं. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol fish colour know what truth and what false)  

हा मासा पाण्याबाहेर येताच गायब होतोय. त्यामुळे हा मासा आहे की दुसरं काय हाच प्रश्न पडलाय. अगदी काळाकुट्ट रंग असलेला हा मासा पाण्यात अगदी स्पष्टपणे दिसतो. पण, पाण्याबाहेर काढताच तो अगदी गायबच होतो. 

व्हीडिओत बघा, हा काळ्या रंगाचा मासा पाण्याने भरलेल्या टबमध्ये पोहताना दिसतोय. त्याचा काळा रंग इतका गडद आहे की पाण्यात तो स्पष्टपणे दिसतो. पण, व्यक्तीनं या माशाला पाण्यातून बाहेर काढलं त्यावेळी माशाचा रंगच उडतो. 

हा मासा आहे की अजून काही, हा मासा आहे कुठला, असे आम्हाला प्रश्न पडले. या सर्व प्रकरणाची आम्ही पडताळणी केली. पडताळणीत काय समोर आलं, हे आपण जाणून घेऊयात.

व्हायरल पोलखोल

रंग बदलणाऱ्या माशाला ग्लास स्क्विड फिश म्हणतात. हा मासा खोल समुद्रात सापडतो. त्वचेत काळ्या रंगाच्या शाईसारखा एक घटक उत्सर्जित करतो.  त्यामुळे ग्लास स्क्विड माशाचा रंग बदलतो. शिकाऱ्यांना हा मासा सहज चकवा देतो. रंगाप्रमाणे हा मासा आपला आकारही बदलू शकतो. याआधीही अशाच रंग बदलणाऱ्या माशाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

या माशावर पाणी पडलं की तो रंग बदलतो. कधी लाल, हिरवा, कधी पिवळा, असे कितीतरी रंग हा प्राणी दाखवतो. असे अनेक रंग बदलणारे मासे आहेत. यामुळे शत्रूपासून स्वत:चा बचाव करण्यासही मदत होते.