मुंबई : व्हीडिओ आहे एका स्टंटबाजीचा. धावत्या मेट्रोमधून 7 ते 8 जण स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मेट्रोवरून स्टंट करणारे हे स्टंटबाज कुठले आहेत? व्हीडिओ मुंबईतल्या मेट्रोचा आहे का? याची आम्ही पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol metro stunt know what truth what false)
धावत्या मेट्रो ट्रेनवरून जीवाशी खेळ सुरूये. मेट्रोच्या छतावर 7-8 जण स्टंटबाजी करतायत. ब्रिजवरून ही मेट्रो जात असताना खाली पाहिलं तरी थरकाप उडेल. पण, हे स्टंटबाज जीवाशी खेळ करत स्टंटबाजी करतायत.
या स्टंटबाजांकडे पाहा. एक दोन नव्हे तर हे 8 स्टंटबाज आहेत. मेट्रो वेगानं चालत असताना यावरून ते चालतायत. जीवाची भीती नाही. ट्रेन वेगानं धावत असताना हे या छतावरून धावतायत. कधी खाली बसतायत. तर काहीजण एकमेकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. वरून खाली कोसळले तर थेट मृत्यूशी गाठ हे माहित असूनही यांनी जीवाची पर्वा न करता हा स्टंट केलाय.
जमिनीपासून या मेट्रोच्या छताची उंची पाहा. किती उंचीवर हे स्टंट करतायत. तरीदेखील हे बिनधास्त आहेत. पण, हे स्टंटबाज कुठले आहेत? मुंबईतले आहेत का? आम्ही या व्हिडिओची पोलखोल केली. त्यावेळी हे स्टंटबाज कुठले आहेत ते समोर आलं.
मेट्रो ट्रेनवरील स्टंटचा व्हिडिओ मुंबईतला नाही. हा व्हिडिओ अमेरिकेतील ब्रुकलिनमधला आहे. एकूण 8 स्टंटबाज असून, त्यांचा शोध सुरू आहे. हे स्टंटबाज ट्रेनच्यावर विल्यम्सबर्ग ब्रिजवरून आले. आणि स्टंट करू लागले. यावेळी एका व्यक्तीने हा व्हिीडिओ बनवला. आता या स्टंटबाजांचा शोध सुरू असून, असे जीवघेणे स्टंट करण्याचं कधी धाडस करू नका.