अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचं भारताबाबत पहिलं वक्तव्य, पाकिस्तान-चीनला जोरदार झटका

पाकिस्तानला आणखी एक झटका

Updated: Jan 22, 2021, 08:00 PM IST
अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचं भारताबाबत पहिलं वक्तव्य, पाकिस्तान-चीनला जोरदार झटका

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत. अमेरिकेतील नव्या सरकारच्या एका निवेदनाने चीन आणि पाकिस्तानचा पुन्हा पचका झाला आहे. भारताला एक महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून संबोधित करताना अमेरिकेने म्हटले की, दोन्ही देशांमधील संबंध असेच दृढतेने पुढे जातील. ट्रम्प यांच्या जाण्याने भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम होईल. असं चीन आणि त्याचा गुलाम पाकिस्तान यांना वाटत होतं. पण तसं झालं नाही.

व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी म्हणाले की, अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलेले जो बिडेन भारत आणि अमेरिका यांच्यातील यशस्वी द्विपक्षीय संबंधाचा आदर करतात. दैनंदिन पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अनेक वेळा भारत भेटीवर आले आहेत. भारताशी अमेरिकेच्या संबंधांचा ते आदर करतात आणि ते पुढेही कायम राहील.

कमला हॅरिस यांचं उपराष्ट्राध्यक्ष होणं हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि यामुळे भारत-अमेरिका संबंध दृढ झाला आहे. ते म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आहेत आणि नवीन राष्ट्राध्यक्षांना ही परंपरा पुढे नेण्याची इच्छा आहे. बायडेन यांची सत्ता आल्याने आपला फायदा होईल अशी पाकिस्तानमध्ये चर्चा होती. बायडेन हे भारताच्या काही धोरणांवर नाराज असल्याचं पाकिस्तानला वाटत होतं. पण तसं झालं नाही.

भारतीय वंशाच्या व्यक्तींना महत्त्वाचं स्थान

बायडेन यांनी भारतीय वंशाच्या 20 लोकांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. जी एक अद्वितीय गोष्ट आहे. नीरा टंडन अर्थसंकल्प तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. त्याच वेळी, माला अडीगा राष्ट्राध्यक्षांची पत्नी यांचं धोरण सल्लागार आहेत. सबरीना सिंह फर्स्ट लेडीच्या मीडिया सल्लागार आहेत. आयशा शाह यांना सोशल मीडिया आणि मीडिया ब्रीफिंगची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे समीरा फाजली जो बिडेन यांना आर्थिक बाबींवर सल्ला देतील. भारत राममूर्ती हे आर्थिक बाबींसाठी सल्लागार आहेत तर गौतम राघवन हे अध्यक्ष म्हणून कर्मचारी नियुक्त करतील. बाडेन यांची भाषणे लिहिण्याची जबाबदारी विनय रेड्डी यांच्यावर आली आहे. वेदांत पटेल हे राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक पत्रकार सचिव आहेत, सोनिया अग्रवाल पर्यावरणविषयक वरिष्ठ सल्लागार आहेत आणि विदूर शर्मा अमेरिकेला कोरोनापासून वाचविणाऱ्या समितीच्या सदस्य आहेत.