नवाज शरीफ यांच्यावर निवडणूक लढविण्यास आजीवन बंदी

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घालण्यात आलेय. 

नवाज शरीफ यांच्यावर निवडणूक लढविण्यास आजीवन बंदी

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घालण्यात आलीय.पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं नवाज शरीफ यांच्यावर हे निर्बंध लादलेयत. याचाच अर्थ यापुढे कुठल्याही सार्वजनिक पदावर शरीफ विराजमान होऊ शकणार नाहीत. जनतेला स्वच्छ चारित्र्याचे नेते हवे आहेतत्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं न्यायाधिशांच्या खंडपीठानं नमुद केलंय. गेल्याच वर्षी पनामा पेपर केसमध्ये सुप्रीम कोर्टानं शरीफ यांना पंतप्रधान पदासाठी अयोग्य ठरविण्यात आले आहे. 

 राजकीय आयुष्य संपुष्टात

पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्यावर आजन्म निवडणूक बंदी लागू केलेय. त्यामुळे त्यांना आता देशात कोणतीच निवडणूक लढवता येणार नाही. दरम्यान, तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद स्वीकारणाऱ्या नवाज यांचे राजकीय आयुष्य संपल्यात जमा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला आहे. नवाज शरीफ यांना या आधीच निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले होते. 

पनामा पेपर प्रकरण भोवले

पनामा पेपर प्रकरणात २८ जुलै २०१७ रोजी त्यांना संसद सदस्यपदी काम करण्यास अपात्र ठरवण्यात आले होते. दरम्यान, एकाद्या प्रकरणात दोषी आढलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यास बंदी घातली असेल तर पुन्हा निवडणूक लढविता येत नाही, असे न्यायालयाचे मत आहे. तोच निर्णय शरीफ यांना लागू करण्यात आलाय. तसेच तहरीक ए इन्साफ या पक्षाचे नेते जहांगीर तारीन यांना याच आधारावर १५ डिसेंबर २०१७ रोजी कायम स्वरूपी अपात्र ठरवण्यात आलेय.